मंत्रीमंडळात डावलल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ प्रचंड नाराज झाले आहेत. मंत्रीमंडळ(cabinet) विस्तारानंतर ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सतत टीका करताना दिसून येत आहेत. नाराज भुजबळ आता कोणती मोठी भूमिका घेणार याबाबत चर्चा सुरू असतानाच त्यांनी आज (23 डिसेंबर) थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीने आता वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलंय.
महायुतीच्या विजायनंतर मंत्रीमंडळात(cabinet) स्थान न मिळाल्याने नाराज असलेले राष्ट्रावादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आज सागर बंगल्यावर फडणवीस यांना भेटले. त्यांच्यात नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली?, भेटीमागील कारण काय होते?, याबाबत भुजबळ यांनी स्वतः माध्यमांशी संवाद साधताना माहिती दिली.
“मी आणि समीर भुजबळ आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर अनेक गोष्टींवर चर्चा झाली. सामाजिक, राजकीय मुद्द्यांवर आम्ही बोललो. काय काय घडलं, काय चालू आहे त्याबाबत चर्चा झाली. वर्तमानपत्र आणि मीडियातून बऱ्याच गोष्टी पाहिल्या आणि ऐकल्या. हे आपण मान्यच करायला हवं, की जो महाविजय मिळाला त्यामागे ओबीसींचं पाठबळ मोठ्या प्रमाणावर लाभलं, असं फडणवीस भेटीत म्हणाले”, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.
तसंच महायुतीच्या विजयामागे ओबीसींनी दिलेला आशीर्वाद होता. त्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजे. हे लक्षात घेऊन ओबीसींचं नुकसान होऊ देणार नाही, असं फडणवीस म्हणाले असल्याचं भुजबळांनी नमूद केलं. तसेच, ओबीसी नेत्यांना सांगा. मी साधकबाधक विचार करत आहे. हा निरोप ओबीसी आणि ओबीसींना पाठबळ देणाऱ्या घटकांना द्या,असंही फडणवीस भुजबळ यांना म्हणाले.
यावेळी फडणवीस यांनी भुजबळ यांना आठ दहा दिवस वेळ द्या, असं म्हटलं. सध्या राज्यात जे काही सुरू आहे. त्यातच आता पाच सहा दिवस मुलांना शाळा कॉलेजला सुट्ट्या आहेत. वेगळं वातावरण आहे. एक आठ दहा दिवस मला तुम्ही द्या. त्यानंतर आपण पुन्हा भेटू आणि एक चांगला मार्ग शोधून काढू, असं म्हणाले असल्याचं भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
म्हणजेच दहा-बारा दिवसांनी छगन भुजबळ पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. एकंदरीत मुख्यमंत्र्यांनी भुजबळांना वेट अँड वॉचचा सल्ला दिल्याचं दिसून येतंय. आता पुढील काही दिवसांत छगन भुजबळ काय निर्णय घेणार, त्याकडे सर्वांचं लक्ष असेल.
हेही वाचा :
210 रुपये गुंतवा अन् वर्षाला मिळवा 60 हजार रुपये…
जिओचा नवा प्लॅन, 3 महिने रिचार्जचं नो टेन्शन, अनलिमिटेड कॉलिंग
दिल्लीच्या बहिणींसाठी ‘आप’ची नवी योजना: सत्तेची चावी केजरीवालांच्या हातात?