इचलकरंजीत सम-विषम पार्किंगवरून वाद; नागरिकांमध्ये नाराजी

इचलकरंजी, 3 जानेवारी 2025: शहर वाहतूक सल्लागार समितीची बैठक रोटरी क्लब येथे पार पडली. बैठकीत सम-विषम पार्किंग(parking)नियमांवर नागरिक व समिती सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला. वाहनधारकांची गैरसोय होत असल्याने ही कारवाई तत्काळ थांबवावी, अशी मागणी करण्यात आली.

या चर्चेदरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. समीरसिंह साळवे यांनी “नागरिकांच्या मागणीनुसार जाहीरनाम्यात बदल करून सम-विषम पार्किंग नियम रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. तोपर्यंत ही कारवाई थांबवावी,” असे स्पष्ट निर्देश दिले.

याचप्रमाणे भगतसिंगबाग परिसरातील पार्किंगसंबंधी(parking) समस्या उपस्थित करण्यात आली. त्यावरही जाहीरनाम्यात आवश्यक बदल करण्याचे आश्वासन साळवे यांनी दिले.

मात्र, शहर वाहतूक शाखेचे प्रभारी प्रशांत निशानदार यांनी DySP साळवे यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून वाहन उचलण्याची कारवाई सुरूच ठेवली. नागरिकांनी वारंवार याबाबत संपर्क साधून आदेशांची आठवण करून दिली, तरीही “आम्ही कारवाई सुरूच ठेवणार,” अशी ठाम भूमिका घेतली गेली.

मुख्य रस्त्यावर छत्रपती शिवतीर्थ ते महात्मा गांधी पुतळा ते राजवाडा चौक या भागात सम-विषम पार्किंगची गरज नसल्याचे मत व्यक्त करून, योग्य पार्किंग व्यवस्था ठरवल्यानंतरच कारवाई करावी, अशी सूचना समिती सदस्यांनी दिली.

यानंतरही वाहन उचलण्याची कारवाई सुरूच राहिल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. “DySP साळवे यांनी आदेश दिल्यानंतरही नियम तोडले जात आहेत. यावर ठोस निर्णय न झाल्यास नागरिक रस्त्यावर उतरतील,” असा इशारा इचलकरंजी नागरिक मंचाने दिला आहे.

हेही वाचा :

‘या’ पाच गोष्टी आजपासून बदलणार, सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री?

सलमान खानचा ‘सिकंदर’ थलापती विजयच्या ‘सरकार’ चित्रपटाचा रिमेक?

 स्वयंपाकात वापरा ‘हे’ तेल आणि जगा निरोगी जीवन