पंजाब किंग्जच्या मालकांमध्ये मतभेदांचा वाद न्यायालयात; प्रीती झिंटा थेट कोर्टात

आयपीएल( cricket)२०२५च्या हंगामाला अद्याप बराच वेळ असताना पंजाब किंग्ज संघातील मालकांमध्ये गंभीर मतभेद समोर आले आहेत, ज्यामुळे संघाच्या भविष्यातील दिशा अनिश्चित झाली आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री आणि संघाच्या सहमालक प्रीती झिंटा यांनी या वादाच्या पार्श्वभूमीवर चंदीगढ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत त्यांनी सहमालक मोहित बर्मन यांच्या विरोधात प्रतिबंधात्मक आदेश देण्याची मागणी केली आहे. प्रीतीने हा कदम उचलल्यामुळे संघातील अंतर्गत वाद आता सार्वजनिक झाल्याचे दिसत आहे.

पंजाब किंग्ज संघाचे चार प्रमुख सहमालक आहेत: मोहित बर्मन, प्रीती झिंटा, नेस वाडिया, आणि करण पॉल. मोहित बर्मन यांच्याकडे सर्वाधिक म्हणजे ४८% मालकी हक्क आहेत, तर प्रीती आणि नेस वाडिया यांच्याकडे प्रत्येकी २३% हिस्सेदारी आहे. चौथा सहमालक करण पॉल यांच्याकडे उर्वरित मालकी हक्क आहेत. वादाचा केंद्रबिंदू हा आहे की मोहित बर्मन यांचा काही हिस्सा एका अज्ञात पक्षाला विकण्याचा विचार आहे, ज्याविरोधात प्रीती झिंटा यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

मोहित बर्मन यांनी क्रिकबझशी संवाद साधताना स्पष्ट केले की, त्यांचा हिस्सा विकण्याचा कोणताही विचार नाही. मात्र, या वादामुळे संघाच्या मालकांमधील मतभेद सार्वजनिक झाले असून, यामुळे संघाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी २० ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे, ज्यामध्ये न्यायालयाने काय निर्णय घेतला हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

या वादामुळे पंजाब किंग्ज संघाच्या आगामी आयपीएल हंगामातील तयारीवर परिणाम होण्याची शक्यता आहे, तसेच संघाच्या मालकांमधील हा वाद कसा सोडवला जातो, हे पाहणे सर्वांसाठी औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा :

“मालेगावात मतदार यादीत एकाच व्यक्तीचे पाच ठिकाणी नावे; धक्कादायक प्रकार उघड”

महाविकास आघाडीत नेतृत्वावरून मतभेद; उद्धव ठाकरेंच्या मागणीला काँग्रेस-राष्ट्रवादीचा नकार

आईच्या हत्येचा सूड; संतप्त मुलाचा आरोपीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार