इचलकरंजी, ता. १६: विसर्जन बंदोबस्तावेळी पोलिसांना (police) मिळेल तो आहार घ्यावा लागतो, ज्यामुळे त्यांच्या आहाराचे योग्य नियोजन होत नाही. या परिस्थितीत पौष्टिक आहार मिळाल्याने पोलिसांना अधिक उर्जा मिळते, असे प्रतिपादन पोलीस उप अधिक्षक समीरसिंह साळवे यांनी केले. ते येथे झालेल्या ‘तंदुरुस्त बंदोबस्त’ उपक्रमाच्या कार्यक्रमात बोलत होते.
सरस्वती रामकिशोर धूत चॅरिटेबल ट्रस्ट आणि कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा यांच्या वतीने यंदाही हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी गणेश विसर्जन बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या ७५० पोलिसांना पौष्टिक आहार म्हणून चिक्की, राजगीरा लाडू आणि मीनरल पाण्याच्या बाटल्या वितरित करण्यात आल्या.
पोलीस (police) उप अधिक्षक समीरसिंह साळवे यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना म्हटले की, “पोलीस अंमलदार हा पोलिस दलाचा कणा असून, बंदोबस्तावेळी ते महत्त्वाची भूमिका बजावतात. गणेशोत्सवातील बंदोबस्तादरम्यान पोलिसांची जबाबदारी वाढत आहे. अशा वेळी पौष्टिक आहार मिळणे आवश्यक असते आणि या उपक्रमामुळे पोलिसांना मोठा आधार मिळतो.”
कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी समाजाचे जिल्हाध्यक्ष नितीन धूत यांनी सांगितले की, “दरवर्षी विसर्जन मिरवणुकीचे शांततेत आयोजन करण्यात पोलिस दल महत्त्वाची भूमिका बजावते. या काळात पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘तंदुरुस्त बंदोबस्त’ उपक्रम राबवण्याचा आम्हाला आनंद आहे. समाजाच्या वतीने पुढील काळातही असे सामाजिक उपक्रम राबवले जातील.”
महापालिकेच्या राजीव गांधी भवन येथे झालेल्या या कार्यक्रमात डॉ. एस. पी. मर्दा यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमात मान्यवरांचा राजस्थानी पगडी आणि बुके देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक सचिन पाटील, प्रविण खानापूरे, सचिन सूर्यवंशी, एन. आर. चौखंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, तसेच माहेश्वरी समाजातील लालचंद गट्टाणी, नंदकिशोर भूतडा, हर्षल धूत, आनंद बांगड, रामगोपाल मालाणी, रामराज भांगडिया, मनोज सारडा, मनोज राठी, श्यामसुंदर झंवर, हरीष सारडा, सुरेंद्र हेडा, सुनील मुंदडा, संजय सोमाणी, कृष्णकांत भूतडा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
‘तंदुरुस्त बंदोबस्त’ उपक्रमामुळे विसर्जन बंदोबस्तादरम्यान पोलिसांना (police) मिळणारा आहार अधिक पौष्टिक आणि उर्जादायी ठरला आहे, असे उपस्थित सर्वांनी मान्य केले.
हेही वाचा:
प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसलेल्या मुलीने आईची हत्या केली
कोल्हापूर अपघातातील गंभीर जखमीला पोलिस वाहनाने तातडीने उपचारासाठी नेले
48 तासांची दारूबंदी! राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, कारण जाणून घ्या