इचलकरंजी महापालिकेच्या प्रशासकपदी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची(corporation) नियुक्ती करण्यात आली आहे. हा आदेश कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी काढला. महापालिकेच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या आणि कार्यभार आयुक्त दिवटे यांच्याकडे होता. मात्र, जिल्हाधिकारी येडगे यांच्या नियुक्तीनंतर हा कार्यभार आता त्यांच्याकडे हस्तांतरित झाला आहे.

महापालिकेच्या प्रशासकीय कारभारात सुधारणा(corporation) करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे. इचलकरंजी महापालिकेत स्थानिक राजकारणातील वादग्रस्त घडामोडी, तसेच माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या वादात्मक भूमिकेमुळे प्रशासकीय स्थिरता राखण्याच्या उद्देशाने हा बदल करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
यामुळे इचलकरंजी महापालिकेच्या कामकाजात आता (corporation) बदल होणार का आणि स्थानिक विकासाला याचा सकारात्मक परिणाम होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
थरारक व्हिडिओ! भरधाव ट्रक डोक्यावरून गेल्यावरही तो जिवंत, कसे घडले हे?
मुलींनी कसे करावे मुलांना प्रपोज? एकापेक्षा एक हटके Ideas
हिरवा वाटाणा अधिक काळासाठी कसा टिकवून ठेवावा?