या मंदिरात होतात डिव्होर्स जाणून घ्या घटस्फोटासाठी प्रसिद्ध असलेल्या मंदिराचा इतिहास

जगात अनेक लहान-मोठी मंदिरे आहेत, प्रत्येकाचा स्वतःचा असा वेगळा(temple) इतिहास आहे. या मंदिरांमध्ये भाविक मोठ्या श्रद्धेने पूजा करतात. पण काही मंदिरांच्या परंपरा इतक्या वेगळ्या आहेत की त्या सर्वसामान्यांना विचार करायला लावतात. अशी अनेक मंदिरे तुम्ही पाहिली किंवा ऐकली असतील, पण घटस्फोटासाठी प्रसिद्ध असलेल्या मंदिराविषयी कधी ऐकले आहे का?

डिव्होर्स टेम्पल
‘डिव्होर्स टेम्पल’ हे नाव ऐकल्यावर असे वाटते की इथे लोक घटस्फोट घेण्यासाठी येतात, पण तसे अजिबात नाही. या मंदिराचा इतिहास जवळपास 700 वर्षांचा आहे आणि इथे कोणाचाही घटस्फोट होत नाही. या मंदिरात घटस्फोट होत नसतील, तर याला ‘डिव्होर्स टेम्पल’ असे नाव का देण्यात आले, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. यामागे एक खास इतिहास आहे.

हे जगातील एक अनोखे मंदिर आहे. डिव्होर्स टेम्पल जपानच्या कानागावा प्रांतात आहे. कानागावा प्रांतातील कामाकुरा शहरातील मत्सुगाओका टोकेई-जी मंदिर ‘डिव्होर्स टेम्पल’ (temple)म्हणून ओळखले जाते. हे मंदिर सुमारे 700 वर्षे जुने आहे. या मंदिराचा इतिहास महिलांशी संबंधित आहे. ज्या महिलांना कोणीही नव्हते, अशा महिलांना या मंदिरात आसरा दिला जात होता.

महिलांसाठी दुसरे घर
हे मंदिर महिलांसाठी दुसरे घर आहे. या मंदिरात घटस्फोट घेण्यासाठी लोक येतात, असा तुमचा समज झाला असेल, पण ते खरे नाही. हे मंदिर असहाय्य महिलांसाठी एक सुरक्षित ठिकाण आहे. असे म्हटले जाते की, हे मंदिर अशा काळात बांधले गेले जेव्हा महिलांना कोणतेही अधिकार नव्हते. कौटुंबिक हिंसाचार आणि छळाला बळी पडलेल्या महिलांना आधार देण्यासाठी हे मंदिर बांधण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, जपानी डिव्होर्स टेम्पल काकुसन (temple)शिदो-नी यांनी बांधले होते. हा तो काळ होता जेव्हा महिलांना कोणतेही अधिकार नव्हते. पुरुष लग्न करायचे आणि जर ते लग्नामुळे खूश नसतील तर ते घटस्फोट द्यायचे. अशा परिस्थितीत, हे मंदिर महिलांसाठी एक आधार बनले. या मंदिरात काही काळ राहिल्यानंतर महिलांना त्यांचे वैवाहिक संबंध संपवण्याची परवानगी मिळत होती.

हेही वाचा :

चॅम्पियन ट्रॉफी सुरु असताना पाकिस्तानात बॉम्बस्फोट

मेट्रो स्टेशनवर खुल्लमखुल्ला रोमान्स जोडप्याचा किस करतानाचा VIDEO व्हायरल

पत्नीने छळ केल्यामुळे TCS मॅनेजरने संपवलं जीवन video viral