केंद्रातील मोदी सरकारने नवरात्रीमध्येच रेल्वे कर्मचाऱ्यांना(employees) मोठी खुशखबरी दिली आहे. सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर केला आहे. रेल्वेच्या 11 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार असून मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने हा बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रेल्वे विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा धुमधडाक्यात जाणार आहे.
मोदी सरकारने रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांना(employees) 78 दिवसांच्या वेतनाईतके बोनस जाहीर केले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांच्या पगारापेक्षा अधिक रक्कम थेट बोनस म्हणून मिळणार आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. या निर्णयाबाबत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिक माहिती दिली आहे.
केंद्राने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा एकूण 11.72 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना होणार आहे. केंद्र सरकारने या बोनसला प्रोडक्टिव्हीटी लिंक्ड रिवॉर्ड असं म्हटलं आहे. यासाठी एकूण 2029 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांना एकूण 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त 18 हजार पर्यंत बोनस दिला जाऊ शकतो.
रेल्वे खात्यात वेगवेगळ्या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारच्या घोषणेअंतर्गत बोनस मिळणार आहे. ट्रॅक मेन्टेनर्स, लोको पायलट, ट्रेन मॅनेजर्स (गार्ड्स), स्टेशन मास्तर, सुपरवायजर्स, टेक्निशियन हेल्पर, पॉइंट्समन, मिनिस्टेरियल स्टाफ, अन्य XC स्टाफ आदी कर्मचाऱ्यांना हे बोनस मिळणार आहे. रेल्वे विभागाचे काम आणखी सुधारावे तसेच रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून हे बोनस दरवर्षी जाहीर केले जाते.
प्रत्येकवर्षी दुर्गा पुजा, दसरा या सणांच्या मुहूर्तावर रेल्वे कर्मचाऱ्यांना या बोनसचे वितरण केले जाते. यावेळी कर्मचाऱ्यांना एकूण 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार आहे. यामुळे लाखो रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होईल.
हेही वाचा:
आज ‘या’ राशींवर राहणार देवी ब्रह्मचारिणीची कृपा!
इचलकरंजीत डॉल्बीचा अतिरेक: पोलीस निष्क्रिय, नागरिक त्रस्त
हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर आता ‘हा’ नेता फुंकणार ‘तुतारी’?; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाची शक्यता