आली आली दिवाळी! आज वसुबारस सण, जाणून घ्या पूजा पद्धत आणि शुभ मुहूर्त

हिंदू धर्मात दिवाळी(festival) हा सर्वात मोठा सण मानला जातो. जवळपास संपूर्ण भारतात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दिवाळीच्या पाच दिवसांचं वेगवेगळं महत्त्व आहे. आज 28 ऑक्टोबररोजी वसुबारस सण आहे. हिंदू धर्मात दिवाळीची सुरुवात वसुबारसने होत असते. या दिवशी गाय आणि वासराची पूजा करण्याची पद्धत आहे. या लेखात या दिवसाचे महत्व, पूजा पद्धत आणि शुभ मुहूर्त याबाबत माहिती देण्यात आली आहे.

वसुबारस महत्व –
गाय आणि वासराच्या अतूट प्रेमाचं प्रतीक म्हणजेच वसुबारचा सण(festival). या दिवशी गाईच्या पायावर पाणी घालून तिला ओवाळलं जातं. गंध लावला जातो. तसेच, चारा खायला दिला जातो. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही गाईची पूजा केली जाते.

वसुबारस शुभ मुहूर्त
वसुबारसचा शुभ मुहूर्त आज 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजून 12 मिनिटांपासून सुरु झाला आहे. दुपारी 1 वाजून 56 मिनिट ते 2 वाजून 41 मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त असेल. त्यानंतर सायंकाळी 5 वाजून 39 मिनिटे तर 6 वाजून 5 मिनिटांपर्यंत मुहूर्त असेल. या काळात पूजा-पाठ करता येईल.

वसुबारस प्रथा-
या दिवशी घरातील गोधनाची पूजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. काही स्त्रिया या दिवशी उपवास देखील करतात. या दिवशी घरातील गाय वासरू यांना अंघोळ घातली जाते. अंगाला हळद लावली जाते, त्यांच्या अंगावर नवी वस्त्रे घातली जातात. भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे आणि सुख लाभावे म्हणून वसुबारसची पूजा केली जाते. आजपासून दिवे देखील लावले जातात.

हेही वाचा :

विजांच्या कडकडाटात दिवाळीचं स्वागत; पावसाच्या हजेरीनं उत्साहावर विरजण

खेड शिवापूर टोलनाक्यावर एक कोटींचा गुटखा जप्त; कर्नाटकातून पुण्यात विक्रीचा प्रयत्न फसला

लहान भावाने मोठ्या केलीभावाची हत्या; आईने साक्ष फिरवली, तरीही कोर्टाने सुनावली जन्मठेप