तुपासोबत चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, फायदे होण्याऐवजी शरीराचे होईल गंभीर नुकसान

दैनंदिन आहारात तूप(ghee) खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. डॉक्टरसुद्धा नियमित एक चमचा तूप खाण्याचा सल्ला देतात. तूप खाल्यामुळे आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांनासुद्धा अनेक फायदे होतात.

सुदंर त्वचा मिळवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी एक चमचा तुपाचे नियमित सेवन करावे. यामुळे पिंपल्स आणि डागांमुळे खराब झालेली त्वचेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. भारतासह इतर अनेक देशांमध्ये तुपाचे(ghee) मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते.

बाजारात गाई, म्हशींच्या दुधापासून तयार केलेले औषधी तूपसुद्धा उपलब्ध असते. तुपामध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात, ज्यामुळे आरोग्याला मोठा फायदा होतो. पण काही लोक चुकीच्या पद्धतीने तुपाचे सेवन करतात.

चुकीच्या पद्धतीने तुपाचे सेवन केल्यास आरोग्याला फायदे होण्याऐवजी नुकसान होईल.त्यामुळे दैनंदिन आहारात योग्य पद्धतीने तुपाचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला तुपाचे सेवन केल्यानंतर कोणते पदार्थ खाऊ नयेत, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

तुपाचे सेवन केल्यानंतर ‘हे’ पदार्थ खाऊ नयेत:
चहा
:
तुपाचे सेवन केल्यानंतर चहाचे सेवन करू नये. यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. तूप आणि चहा या दोन्ही गोष्टींचे एकत्र सेवन केल्यामुळे पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. पचनक्रिया बिघडल्यानंतर अपचन, असिडिटी, गॅस इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे तूप खाल्यानंतर दोन तासांनी इतर पदार्थांचे सेवन करावे.

मध:
मध खाल्यानंतर तुपाचे सेवन करू नये. आयुर्वेदामध्ये मध खाल्यानंतर तूप खाण्यास मनाई आहे. हे दोन्ही पदार्थ एकमेकांच्या विरुद्ध असल्यामुळे आरोग्यावर त्याचा चुकीचा परिणाम दिसून येतो. दोन वेगवेगळ्या नैसर्गिक गोष्टींचे एकत्र सेवन केल्यामुळे पोटात रासायनिक बदल होऊ शकतात. त्यामुळे मध आणि तूप एकत्र खाऊ नये.

मासे:
मासे, चिकन किंवा मटण खाल्यानंतर तुपाचे सेवन करण्यास मनाई आहे. या दोन्ही पदार्थांचे एकत्र सेवन केल्यास पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. शिवाय यामुळे शरीरात हानिकारक टॉक्सिन्स तयार होऊ लागतात, ज्यामुळे त्वचेसंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे दैनंदिन आहारात या दोन्ही पदार्थांचे सेवन करू नये.

लिंबूवर्गीय फळे:
लिंबूवर्गीय फळांचे सेवन केल्यानंतर दोन तास कोणत्याही पदार्थाचे सेवन करू नये. यामुळे शरीराचे नुकसान होण्याची शक्यता असते. लिंबूवर्गीय फळांच्या सेवनानंतर तूप खाऊ नये. तूप खाल्यास आरोग्य बिघडू शकते. पचनसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. लिंबूवर्गीय फळांचे सेवन केल्यानंतर तूप खाल्यास पचनक्रिया मंदावते, ज्याचा परिणाम आरोग्यावर होतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

हेही वाचा :

महाराष्ट्रात वादळी अतिमुसळधार पावसाचा इशारा; 11 जिल्ह्यात अलर्ट जारी

मोठी बातमी! पंजाबमध्ये खाजगी बस नदीत कोसळली; 8 प्रवाशांचा मृत्यू, अनेकजण जखमी

 ‘…त्यामुळे शहा यांनी राजीनामा द्यावा’; आंबेडकरवादी संघटनांची मागणी