सुट्टीच्या दिवशी जास्त झोप घेताय का संशोधनातून हृदयाला हात घालणारी माहिती समोर

ऑफिसमध्ये सकाळची शिफ्ट असेल तर(holidays) अनेकदा आपली झोप पूर्ण होत नाही. अशावेळी आपण विकेंडला म्हणजेच शनिवार आणि रविवारी जास्त वेळ लोळत राहून झोप पूर्ण करतो. कदाचित तुमहीही असं करत असाल…आपल्या शरीराला झोप ही फार गरजेची आहे. ८ तासांची झोप घेणं हे आरोग्यासाठी उत्तम आहे.अमेरिकन अकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिनच्या शिफारसीनुसार, आपण किमान ७ ते ८ तास झोपलं पाहिजे. परंतु जलद जीवनशैली आणि चुकीच्या सवयींमुळे अनेक लोकांना पूर्ण झोप घेता येत नाही. त्यामुळे या व्यक्ती दररोज ७ तासांची झोप पूर्ण करू शकत नाहीत.अशा परिस्थितीत, जर तुम्ही आठवड्याच्या शेवटी तुमची झोप भरून काढली तर हृदयाचे आरोग्य सुधारू शकते आणि हृदयरोगाचा धोका २०% कमी होऊ शकतो. युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीच्या रिपोर्टमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे.

काय सांगतो नवा रिसर्च?
चीनच्या राष्ट्रीय हृदयरोग केंद्रातील लेखक यंजुन सॉन्ग यांनी नुकत्याच एका अभ्यासाचा अहवाल सादर केला आहे. ज्यामध्ये असं म्हटलंय की, आठवड्याच्या शेवटी जास्त झोपल्याने हृदयरोगाचा धोका कमी करता येतो. गेल्या १४ वर्षांपासून ९१००० व्यक्तींवर संशोधन करण्यात (holidays) आलं.या संशोधनात सहभागी झालेल्या व्यक्तींना चार गटात विभागण्यात आलं होतं. दररोज रात्री कोण कमी झोपलं आणि कोणी जास्त झोप घेतली या आधारावर हे गट तयार करण्यात आले होते. ज्यावेळी त्यांची माहिती घेण्यात आली तेव्हा असं आढळून आले की, ज्यांनी आठवड्याच्या शेवटी त्यांची कमी घेतलेली झोप भरून काढली त्यांच्या हृदयाशी संबंधित धोका सुमारे २०% कमी झाला आहे.

विकेंडला झोप घेण्याचे फायदे
जर तुम्ही दररोज ७ तास झोपल असाल किंवा आठवड्याच्या शेवटी तुमची उर्वरित झोप पूर्ण केली तर तुमच्या शरीरातील उर्जेची पातळी कायम राहण्यास मदत होते. परिणामी (holidays) तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटतं. याशिवाय चांगली झोप स्मरणशक्ती सुधारते आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढवते.तज्ञांच्या सांगण्यानुसार, चांगली झोप घेतल्याने रक्तदाब आणि वजन नियंत्रित करता येतं. त्यामुळे जर तुम्ही वजन कमी करत असाल तर तुम्हाला चांगली झोप घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते. त्यामुळे शरीराला रोगांशी लढण्यास मदत होते.

हेही वाचा :

मजा बन गई सजा! घिबली ट्रेंडमुळे गोपनीतेला धोका, सायबर हल्ला होणार…

सूनबाई माझं म्हणणं नीट ऐकं लग्नाच्या दिवशी सासऱ्याने होणाऱ्या सूनेकडे अशी मागणी केली

महाराष्ट्र हादरला! बायको माहेरी गेल्याने सटकली; नवऱ्याने पत्नी आणि सासूला जिवंत पेट

मजा बन गई सजा! घिबली ट्रेंडमुळे गोपनीतेला धोका, सायबर हल्ला होणार…

अंबाबाईच्या दर्शनाआधी पंचगंगेत उतरले; पाण्यात उतरताच धाप लागली आणि… तरुणासोबत भयंकर घडलं