वीजचोरी व गळती रोखून आता थकबाकीच्या कटकटीतून ‘महावितरण’ (agricultural pump)आता मोकळा श्वास घेणार आहे. कृषीपंप सोडून घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक अशा सर्वच ग्राहकांना आता प्रिपेड मीटर दिले जाणार आहेत. जिल्ह्यातील १२ लाख तर शहरातील दोन लाख ३१ हजार ग्राहकांचा त्यात समावेश आहे.
सोलापूर : वीजचोरी व गळती रोखून आता थकबाकीच्या कटकटीतून ‘महावितरण’ आता मोकळा श्वास घेणार आहे. शेतकरी (agricultural pump) सोडून घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक अशा सर्वच ग्राहकांना आता प्रिपेड मीटर दिले जाणार आहेत. जिल्ह्यातील १२ लाख तर सोलापूर शहरातील दोन लाख ३१ हजार ग्राहकांचा त्यात समावेश आहे. ग्राहक जेवढा रिचार्ज करतील तेवढीच वीज त्यांना वापरता येणार आहे.
सध्या वीजपुरवठा करण्यासाठी ‘महावितरण’ने खांबांवरून खुल्या तारा टाकल्या आहेत. पावसाळ्यात, वादळात अनेकदा तारा एकमेकांना किंवा झाडाला चिकटतात आणि त्यामुळे तांत्रिक अडथळा येतो व वीजपुरवठा खंडीत होतो. आता ‘एबी’ (एरियल बंडल केबल) केबल टाकल्यानंतर ना झाडांचा ना पावसामुळे अडचण येते. तारांना अडथळा करणाऱ्या झाडांची छाटणी देखील करण्याची गरज भासणार नाही अशी ही केबल आहे.
पहिल्या टप्प्यात सोलापूर शहरातील मजरेवाडी, सेटलमेंट फ्रि कॉलनी अशा विविध परिसरात ९० किलोमीटर एबी केबल टाकली जाणार आहे. त्यासंबंधीचा ‘महावितरण’ने यापूर्वी सर्व्हे केला असून त्याची निविदा देखील प्रसिद्ध होऊन मक्तेदार निश्चित झाला आहे. आगामी काही दिवसांत या कामाला सुरवात होईल. त्यानंतर पुढच्या टप्प्यात शहरातील १५० किलोमीटरचे काम देखील होणार आहे.
सोलापूर शहर- ग्रामीणमध्ये एकूण ५०० किलोमीटर अशी केबल टाकली जाणार आहे. भविष्यात उच्चदाब वाहिनींवर आता कोटिंग कंडक्टर बसविले जाणार असल्याने शॉक लागून मृत्यू किंवा गंभीर जखमी होण्याच्या घटना थांबणार आहेत. तर ‘एबी’ केबलमुळे तारांवर आकडे टाकून कोणालाही चोरून वीज घेता येणार नाही.
सोलापूर शहरातील स्थिती
शहरातील ग्राहक
२.३१ लाख
‘महावितरण’ची लाईन
२१८ किमी
‘महावितरण’ कार्यालये
२९
दररोज वीजेची मागणी
१२० मेगावॅटसोलापूर शहरासह जिल्ह्यातील सर्वच ग्राहकांच्या घरी आता प्रिपेड मीटर बसविले जाणार आहेत. त्याची निविदा निघाली असून मक्तेदारही निश्चित झाला आहे. काही महिन्यात त्याचे काम सुरु होईल. दुसरीकडे वीजेचा शॉक लागून होणाऱ्या घटना (सुरक्षितता) व वीजचोरी रोखण्यासाठी टप्प्याटप्प्याने एरियल बंच्ड केबल (एबी केबल) टाकली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सोलापूर शहरातील ९० किमीचे काम होईल आणि त्यानंतर संपूर्ण शहरात हे काम होईल.
हेही वाचा :
ठग्स ऑफ पॉलिटिशियन इन महाराष्ट्र
ब्रेकिंग! दिल्लीचे CM अरविंद केजरीवाल १५ दिवस तुरुंगात
एप्रिल महिना सिनेरसिकांसाठी ठरणार खास, ३ जबरदस्त चित्रपट येणार भेटीला