साबुदाण्याची खिचडी कंटाळवाणी वाटते? मग ‘ही’ नवी रेसिपी नक्की ट्राय करा!

हिंदू धर्मात दर महिन्याला संकष्टी किंवा काही ठरावीक (boring)वारांना उपवास केला जातो. उपवाला अनेक गृहीणी साबुदाण्याचे पदार्थ तयार करतात. त्यामध्ये साबुदाण्याची खिचडी आवर्जून खाल्ली जाते. पण तुम्हाला काही चटपटीत आणि झटपट होणारे पदार्थ खायचे आहेत का? तुम्हाला माहित नसेल पण साबुदाण्यापासून अनेक कुरकुरीत, चटपटीत, मऊ लुसलुशीत पदार्थ तयार केले जातात. चला तर जाणून घेऊ रेसिपी आणि पदार्थांची नावे.

साबुदाणा खिचडी रेसिपी
भिजवलेले साबुदाणे घ्या. आता एका कढईत तेल तापवा. त्यामध्ये जीरे आणि हिरवी मिरची आणि कढीपत्ता घाला. त्यानंतर उकडलेला बटाटा बारिक चिरून परतून घ्या. २ ते ३ मिनिटांनी त्यामध्ये साबुदाणे मिक्स करून छान परतून घ्या. ५ मिनिटांनी त्यात मीठ आणि कोथिंबीर टाकून खिचडी सर्व्ह करा.

साबुदाणा टिक्की
भिजवलेले साबुदाणे घ्या. बटाटे उकडून घ्या. आता साबुदाणे, बटाटे, शेंगदाणे, हिरवी मिरची, मसाले, मीठ हे मिश्रण एकत्र करून पीठ मळून घ्या. त्यामध्ये पाण्याचा वापर करू (boring)नका. आता पिठाचे छोटे छोटे गोळे करून टिक्कीचा आकार द्या. आता तेलात फ्राय करून टिक्की सर्व्ह करा.

साबुदाणा खीर
२ ते ३ तास साबुदाणे भिजवून घ्या. त्याचसोबत एका भांड्यात दूध उकळवून घ्या. आता उकळेल्या दूधात साबुदाणे मिक्स करून शिजवून घ्या. थोड्या वेळाने त्यामध्ये साखर आणि एक चमचा तूप मिक्स करा. ५ते ६ मिनिटांनी गॅस बंद करून खिर सर्व्ह करा.

साबुदाणा वडा
साबुदाणा वडा हा उपवासाला परफेक्ट चटपटीत पदार्थ आहे.(boring) त्यासाठी भिजवलेले साबूदाणे घ्या. सोबत शेंगदाण्यांचा कुट आणि उकडलेला बटाटा घ्या. आता तुम्ही साबुदाणे, शेंगदाण्यांचा कुट, हिरवी मिरची, जीरे, मीठ हे साहित्य मिक्स करून पीठ तयार करा. पीठाचे छोटे गोळे करून वड्यांचा आकार द्या. पीठ व्यवस्थित मिक्स करता येत नसेल तर आणखी बटाट्याचा वापर करू शकता. आता एका कढईत तेल गरम करा. त्यामध्ये वडे मिक्स करून छान गरमा गरम कुरकुरीत वडे सर्व्ह करा.

हेही वाचा :

इंडियन नेव्ही भरती: SSR मेडिकल असिस्टंट पदासाठी करा अर्ज; येथे करा Apply

बॉयफ्रेंडसोबत बोलण्यासाठी मुलीची आयफोनची मागणी, थेट मनगटच कापलं; मग पुढे जे घडलं… Video Viral

उन्हाळ्यात तुम्हीसुद्धा थंड पाणी पिता? शरीरावर होतील अनेक गंभीर दुष्परिणाम

‘श्रीदेवी आणि मिथुन चक्रवर्ती रात्रभर…,’ दिग्दर्शकाने पहिल्यांदाच केला खुलासा

खळबळजनक! राष्ट्रवादीच्या नेत्याच्या बंगल्यासमोर जादूटोणा, नारळ, बाहुल्या, लिंबू अन्….