खरंच तिला मी आवडतो का? ‘या’ 5 वागणुकीतून समजेल तिच्या मनातलं प्रेम

प्रेम (love)म्हणजे काय? असा प्रश्न सहज विचारला जातो. जितका सोपा हा प्रश्न आहे तितकेच याचे उत्तर अवघड आहे. काही जणांसाठी प्रेम हे एकतर्फी असू शकते.

पण किती वेळ एकतर्फी(love) प्रेमात आपण आपले आयुष्य काढणार? खरंतर प्रत्येक व्यक्तीला वाटते की आपल्यावर कोणीतरी मनापासून प्रेम करावे. पण कित्येकदा आपल्याला समजत नाही जिच्यावर आपण सात फेरे घेण्याचा विचार करतोय, त्या मुलीला आपल्यावर प्रेम आहे का?

जेव्हा आपण एखाद्यावर खूप प्रेम करतो आणि ती व्यक्ती देखील आपल्यावर तितकेच प्रेम करते की नाही याची आपल्याला खात्री नसते, तेव्हा आपल्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होतात. हे प्रश्न खूप गोंधळात टाकणारे आहेत आणि त्यांची उत्तरे शोधणे सोपे नाही. परंतु काही वागणुकीतून तुम्हाला समजू शकते की तिच्या मनात तुमच्याबद्दल प्रेम आहे की नाही.

या ५ गोष्टींकडे बारीक लक्ष द्या
तुमचा म्हणणं आणि तिचं बारीक लक्ष
जेव्हा तुम्ही एकदाही गोष्ट तिला सांगत असतात तेव्हा जर ती तुमचे म्हणणे नीट लक्षपूर्वक ऐकत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की ती तुमच्या भावना समजून घेते आणि तुमची काळजी करते. ती कधीच तुमच्या बोलण्यात व्यत्यय आणत नाहीत आणि तुम्हाला पूर्णपणे बोलण्याची संधी देते.

तिला तुमचा सहवास आवडतो
जर तिला तुमच्यासोबत वेळ घालवायला आवडत असेल, तर ती तुमच्यावर प्रेम करते हे स्पष्ट लक्षण आहे. ती तुमच्यासोबत बाहेर जाते, तुमच्याशी बोलते आणि तुमच्यासोबत वेळ घालवण्याचे नवीन मार्ग शोधते.

शरीरात निर्माण झालेल्या कामाच्या तणावापासून सुटका मिळवण्यासाठी घरी बनवा स्पेशल चॉकलेट ड्रिंक

तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर
जेव्हा तुम्ही अडचणीत असता तेव्हा ती तुम्हाला मदत करण्यास नेहमीच तयार असते. ती तुमच्या भावनांची काळजी घेते आणि तुम्हाला शक्य तितका पाठिंबा देण्याचा प्रयत्न करते.

कौतुका करत असते
जेव्हा ती तुमची प्रशंसा करतो तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की ती तुमच्यातील चांगल्या गोष्टींना वाव देते. ती तुमचे कौतुक करून तुमच्यातील आत्मविश्वास वाढवते.

तुमच्या भावनांचा आदर
जेव्हा तुमच्या भावनांचा आदर करते तेव्हा याचा अर्थ तिला तुमची काळजी आहे. ती तुमच्या भावना दुखावत नाहीत आणि तुमच्या भावना समजून घेण्याचा नेहमी प्रयत्न करत असते.

ही वागणूक दिसल्यास समजून जावा तुमचं प्रेम एकतर्फी आहे
तुमच्यासोबत वेळ घालवण्यास तयार नाही.
तुमच्या भावनांची काळजी नाही.
कधीच कौतुक करत नाही.
तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणे.

हेही वाचा :

Flipkart आणि Amazon ची सेल सुरु, स्मार्टफोनपासून होम अप्लायंसेसपर्यंत सर्व वस्तूंवर आकर्षक डिस्काऊंट!

उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल: ‘पत्नीसोबत अनैसर्गिक संबंध ठेवणे गुन्हा’

बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यातले वाद मिटणार? चर्चेत बच्चू कडूंचं ‘ते’ विधान