देशात भाषावार प्रांत रचना भैय्याजीना माहित नाही?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : आधी प्रशांत कोरटकर, नंतर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी, आणि आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी भैय्याजी जोशी यांनी वादग्रस्त वक्तव्याची मालिका पुढे चालू ठेवली आहे. मुंबईची मराठी अशी एक भाषा(linguistic structure) नाही. घाटकोपर मध्ये गुजराती, गिरगाव मध्ये मराठी अशी मुंबईची वादग्रस्त भाषावार विभागणी भैय्याजी यांनी केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी विद्वान असतात असे म्हटले जाते. पण काही व्यक्तींना, भैय्याजी जोशी यांना देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावार प्रांतरचना करण्यात आली हेच माहीत नसावे. तसे असते तर अशी वादग्रस्त बाष्कळ विधाने केली गेली नसती. भैय्याजी जोशी यांनी त्यांचे विधान मागे घेतले पाहिजे आणि त्यासाठी मराठी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली पाहिजे.

भाषावार प्रांतरचनेनुसार मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्र हा मराठी भाषिक आहे. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात शहीद झालेले बहुतांशी मराठी आहेत. मुंबईच्या काही भागात मराठी विरुद्ध हिंदी असा संघर्ष झाल्याच्या घटना घडल्या आहेत आणि घडत आहेत. मराठी भाषिक ग्राहकाला कुणीतरी परप्रांतीय म्हणतो”हिंदी मे बात करो”तर मराठी भाषिक हा परप्रांतीयाला मराठीत बोल असा आग्रह करतानाच्या घटना घडल्या आहेत. त्यावर अनेक ठिकाणी वाद विकोपाला गेलेला आहे.

कल्याण मध्ये तर कुठले तरी उत्तर भारतीय कुटुंब मराठी भाषिकाला(linguistic structure) ते मराठी आहेत म्हणून मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. मांसाहार करणाऱ्या मराठी माणसाला मुंबईत फ्लॅट देण्यास नकार देणाऱ्या काही घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. अशी एकूण मराठी माणसाची परप्रांतीयांकडून गळ्याचे पीस सुरू आहे आणि त्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही एकमेव राजकीय संघटना रस्त्यावर उतरून आवाज उठवत आहे. या एकूण पार्श्वभूमीवर भैय्याजी जोशी यांनी केलेले वक्तव्य मराठी माणसाला खटकणारे आहे.

मुंबईत विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना भैय्याजी जोशी यांनी वादग्रस्त विधान केलेले आहे. त्याबद्दल अनेक राजकीय नेत्यांच्या कडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने याबद्दल आपली स्पष्ट भूमिका जाहीर केली पाहिजे अशी मागणी होऊ लागल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत मराठी आणि महाराष्ट्रात मराठी, हे ठामपणे सांगून टाकले आहे. पण त्याचबरोबर भैय्याजी जोशी यांचे भाषण मी ऐकलेले नाही असा खुलासाही करण्यास ते विसरलेले नाहीत. वास्तविक भैय्याजी जोशी यांनी आपले विधान मागे घेतले पाहिजे असे आवाहन सरकारच्या वतीने केले गेले पाहिजे.

‌दुकानांच्या पाट्या या मराठीतच असल्या पाहिजेत असे मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. पण तरीही महाराष्ट्रात राहणाऱ्या परप्रांतीय दुकानदारांच्याकडून मराठी पाटी लावण्यास विरोध होऊ लागला आहे. मात्र या अमराठी दुकानदारांच्या विरुद्ध मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. वास्तविक अशाच प्रकारची भूमिका अन्य राजकीय पक्षांनी घेणे अपेक्षित होते.

मुंबई कोणाची? हे सांगणारी अण्णाभाऊ साठे यांची छक्कड लावणी भैय्याजी जोशी यांना कुणीतरी ऐकवली पाहिजे. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा मुंबईत मराठी माणसाची टक्केवारी इतर भाषिकांपेक्षा मोठी होती. त्यानंतर मराठी भाषिक जनतेचे हित साधण्याच्या हेतूने बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. मुंबईतला मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला जाऊ नये अशी भूमिका त्यांची होती. प्रत्यक्षात मात्र सध्या मुंबईत मराठी भाषकांचा टक्का खाली गेला आहे. मराठी माणूस वसई, विरार, नालासोपारा, नायगाव, इतक्या दूर फेकला गेला आहे. आणि त्यामुळेच मुंबईतल्या मराठी माणसाची परप्रांतीय मंडळींच्याकडून गळचेपी होताना दिसते आहे.

मुंबईतून मराठी माणूस हद्दपार का होतो आहे याचे आत्मचिंतन कोणत्याही राजकीय पक्षांने आजतागायत केलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणूनच भैय्याजी जोशी यांच्यासारखे लोक मुंबई शहराची भाषावार रचना किंवा विभागणी करण्याचे धाडस करत आहेत. त्यांच्याकडून खरे तर संयुक्त महाराष्ट्रासाठी शहीद झालेल्या मराठी माणसाचा अपमानच झालेला आहे असे म्हणता येईल.

मुंबई कोणाची आणि महाराष्ट्र कोणाचा हे स्वच्छ शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगून टाकले आहे. त्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुकही केलेले आहे. तथापि भैय्याजी जोशी यांनी आपले वक्तव्य किंवा विधान मागे घेतले पाहिजे अशी आक्रमक भूमिका त्यांच्याकडून अपेक्षित होती.

मराठी भाषेशी(linguistic structure) द्रोह करणाऱ्या भैय्याजी जोशी यांनी त्यांच्यावर टीकेची जोड उठू लागतात सारवासारव केली आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात मराठीचे भाषा आहे आणि ती असली पाहिजे असा खुलासा त्यांनी केला आहे. भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी हे राज्य मराठ्यांचे नव्हे तर मराठीचे आहे अशा शब्दात हा महाराष्ट्र मराठी भाषकांचा असल्याचे म्हटले होते.

भैय्याजी जोशी हे स्वतः मराठीच आहेत त्यामुळे त्यांना हा इतिहास माहिती असला पाहिजे. आपण काय बोलतो आहोत आणि त्याचे पडसाद काय उमटणार आहेत हे त्यांना माहीत नाही असे अजिबात म्हणता येणार नाही. त्यांनी मुंबईत मराठी भाषा ही एकमेव नाही. मराठी भाषा बोलण्याची अन्य कोणावरही सक्ती करता येणार नाही. मुंबई ही मराठी भाषिकांची नाही असे त्यांना अप्रत्यक्षपणे सुचवायचे होते. पण आता त्यांनी आपल्या वक्तव्यापासून माघार घेतली आहे.

हेही वाचा :

सांगलीमध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीसोबत घडलं भयंकर, शेजारी बसून तरुणीसोबत अश्लील कृत्य

IPL 2025 आधी SRH ला मोठा धक्का! स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर

वजन कमी करायचंय? मग सकाळच्या नाश्त्याला झटपट बनवा ओट्स ऑम्लेट