पंजाबच्या मोहाली येथे अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी (momos)मोमोज आणि स्प्रिंग रोल फॅक्टरीच्या फ्रीजमध्ये कुत्र्याचे छाटलेले डोके आढळल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. मात्र, मोहालीच्या उपआयुक्त कोमल मित्तल यांनी या दाव्यांचे खंडन केले असून, “मोमोज फॅक्टरीत वापरण्यात आलेले मांस कुत्र्याचे असल्याच्या अफवा दिशाभूल करणाऱ्या आहेत,” असे स्पष्ट केले आहे.

आरोग्य तपासणीत कुत्र्याच्या मांसाचा वापर नसल्याचे निष्कर्ष
कोमल मित्तल यांनी सांगितले की, “आरोग्य विभागाच्या तपासणीत हे सिद्ध झाले आहे की, आढळलेले मांस कुत्र्याचे नाही.” मात्र, कोणत्या प्राण्याचे मांस आहे, हे निश्चित करण्यासाठी प्राणी पालन तज्ज्ञांकडून अधिक तपास सुरू आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत, (momos)असे आवाहन त्यांनी केले.
अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई
मोमोज फॅक्टरीतील अस्वच्छ परिस्थितीचा गंभीर नोटीस घेत “सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही,” असा इशारा कोमल मित्तल यांनी दिला.रविवारी 17 मार्च अन्न सुरक्षा, आरोग्य आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या टीमने माटौर भागात धाड टाकली. यावेळी फॅक्टरीतील अन्नपदार्थ आणि भाज्यांचे नमुने गोळा करण्यात आले. “या धाडीत अनेक अस्वच्छ आणि धोकादायक अन्नपदार्थ सापडले, त्यामुळे जबाबदार व्यक्तींवर FIR दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत,” असे मित्तल यांनी (momos)सांगितले.
गंभीर गुन्ह्यांत एफआयआर नोंदवला
एसएसपी दीपक पारीक यांनी माहिती दिली की, भारीत न्याया संहितेच्या कलम 272 धोकादायक अन्नजन्य संसर्ग पसरवण्याचा कृत्य आणि कलम 274 अन्न भेसळअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फेरीवाल्यांवर देखरेख आणि अनधिकृत मांस विक्रीवर कारवाईउपआयुक्त कोमल मित्तल यांनी आरोग्य, अन्न सुरक्षा आणि महापालिका अधिकाऱ्यांना मोहालीतील स्ट्रीट फूड विक्रेत्यांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. “स्वच्छता आणि अन्न सुरक्षेचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर दंड लावला जाईल,” असे त्यांनी सांगितले.महापालिका आयुक्त परमिंदर पाल सिंग यांना “अनधिकृत अन्नगाड्या नियमन करण्यास आणि बेकायदेशीर मांस विक्रीवर कठोर कारवाई करण्यास” आदेश देण्यात आले आहेत.
हेही वाचा :
मार्चचा शेवटचा आठवडा गेमचेंजर ठरणार! ‘या’ 3 राशींचा गोल्डन टाईम सुरू
प्रियकरासह समुद्राच्या लाटा पाहण्यासाठी आली होती प्रेयसी, पण… Video Viral
‘खल्लासच करतो’ म्हणत तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हा