दुर्गाष्टमीला कन्यापूजन करताय? मुलींना काय गिफ्ट द्याल? एकापेक्षा एक भारी आयडिया जाणून घ्या..

शारदीय नवरात्री गुरूवारी 3 ऑक्टोबरला सुरू झाली. आणि पाहता पाहता आता दसऱ्याचा सणही जवळ आला. या नवरात्रीत(Navratri)सर्वत्र भक्तिमय वातावरण दिसून आलं. घरोघरी ते मंदिरापर्यंत देवीचे गुणगान होत आहे. तर धार्मिक मान्यतेनुसार, नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमीलाही कन्यापूजन करण्याची परंपरा आहे. जी 12 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. जर तुम्हीही कन्यापूजन करणार असाल, आणि तुम्हाला या मुलींना काय भेट द्यायची? असा प्रश्न पडला असेल, तर आज आम्ही तुम्हाला खास गिफ्ट आयडिया सांगणार आहोत. जाणून घ्या

नवरात्रीच्या(Navratri)अष्टमी तिथीला महाअष्टमी किंवा नवमी तिथी महानवमी म्हणूनही ओळखली जाते. या दिवशी देवी दुर्गेचे आठवे रूप देवी महागौरी आणि नवव्या तिथीला देवी सिद्धी दात्रीची पूजा करण्याची परंपरा आहे. अष्टमी आणि नवमी तिथीलाही कन्यापूजेला विशेष महत्त्व आहे. कन्यापूजेच्या दिवशी मुलींची पूजा करून त्यांना काही भेटवस्तूही दिल्या जातात. आशीर्वाद घेतले जातात. चला जाणून घेऊया कन्या पूजेला मुलींना कोणते गिफ्ट द्यावे?

स्टेशनरी किट
तुम्ही लहान मुलींना स्टेशनरी किट भेट देऊ शकता. मुलींना हे खूप आवडू शकते. त्या त्यांच्या अभ्यासासाठी रोज वापरू शकतात. त्यात तुम्ही वही, पेन्सिल, कटर, खोडरबर, रंग, जिओमेट्री बॉक्स इत्यादी देऊ शकता. त्यांना हे गिफ्ट खूप आवडेल.

ताटासह फळे
कन्यापूजेला घरी येणाऱ्या मुलींना तुम्ही स्टीलच्या ताटात अनेक प्रकारची फळे देऊ शकता. त्यात केळी, डाळिंब, हंगामी फळे, सफरचंद आणि नारळ यांचा समावेश करू शकता. त्यांच्या आरोग्यासाठी हे फळ खूप फायदेशीर आहे.

खेळणी
तुमच्या घरी येणाऱ्या मुलींना तुम्ही मेकअपच्या वस्तू देऊ शकता. त्यांनाही हे खूप आवडेल. हे पाहून त्याचा चेहऱ्यावर एक वेगळा आनंद तुम्ही पाहू शकता. तुम्ही त्याच्यासोबत एक खेळणी देखील भेट देऊ शकता. हे त्यांचे खूप मनोरंजन करेल. यामध्ये तुम्ही विविध खेळणी जसे की बाहुली, बिअर्स, फुलांचा समावेश करू शकता.

हेही वाचा:

 3 अज्ञातांकडून युवकाचे अपहरण; कारमध्ये बसवलं अन्…

भारतीय क्रिकेट संघाचा चिंता ठरला हार्दिक पांड्या, व्हिडीओ पाहून तुम्ही पण व्हाल थक्क

नवरात्रोत्सवात होणार स्त्रीशक्तीचा जागर, अनुश्री फिल्म्स प्रस्तुत तीन लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला