शेअर बाजारात झालेल्या मोठ्या घसरणीनंतर आता सर्वसामान्यांना आर्थिक झटका देणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या(cylinder) किंमतीत थेट ₹५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे घरगुती बजेटवर मोठा परिणाम होणार असून, केंद्र सरकारने यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ८ एप्रिलपासून लागू होणाऱ्या नव्या दरांची माहिती दिली. यानुसार, 14.2 किलो वजनाच्या घरगुती सिलेंडरसाठी(cylinder) आता ग्राहकांना ₹853 मोजावे लागणार आहेत. आधी हा दर ₹803 होता. ही दरवाढ देशभर लागू करण्यात आली असून, उज्ज्वला योजनेतील ग्राहकांनाही याचा फटका बसणार आहे.
उज्ज्वला योजनेतील गॅसही महाग :
सामान्य ग्राहकांप्रमाणेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणाऱ्या गॅस सिलेंडरच्या किंमतीतही ₹५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे योजनेअंतर्गत मिळणारा सिलेंडर आता ₹503 ऐवजी ₹553 रुपयांना मिळणार आहे.
केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, “दर दोन ते तीन आठवड्यांनी गॅस दरांचे पुनरावलोकन केले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्याने ही दरवाढ अनिवार्य झाली आहे. मात्र, सामान्य नागरिकांवर याचा फारसा भार पडू नये यासाठी उत्पादन शुल्कातील समायोजन करता येणार आहे.”

प्रमुख शहरांतील नव्या किंमती :
इंडियन ऑईलच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, ८ एप्रिलपासून विविध शहरांतील एलपीजी दर पुढीलप्रमाणे आहेत:
दिल्ली: ₹853
मुंबई: ₹852.90
कोलकाता: ₹879.00
चेन्नई: ₹868.50
लखनऊ: ₹890.50
पटना: ₹951.00
जयपूर: ₹856.50
देहरादून: ₹850.50
या दरवाढीमुळे अनेक कुटुंबांचे मासिक बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दरवाढ झाल्यामुळे ग्राहकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. काही राज्यांमध्ये यासंदर्भात सरकारकडून सवलतीची मागणी केली जात आहे.
हेही वाचा :
महाराष्ट्र हादरला! बायको माहेरी गेल्याने सटकली; नवऱ्याने पत्नी आणि सासूला जिवंत पेटवलं
सूनबाई माझं म्हणणं नीट ऐकं लग्नाच्या दिवशी सासऱ्याने होणाऱ्या सूनेकडे अशी मागणी केली
धक्कादायक! सांगलीचे माजी महापौर सुरेश पाटील यांचा आत्महत्येचा प्रयत्न