एकनाथ शिंदेंना मंत्रिमंडळात घेऊ नका; फडणवीसांकडे ‘या’ नेत्याने केली मागणी

विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आज शिवसेना(political issue) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी मुंबई येथील रस्ता घोटाळ्याची एसआयटी चौकशी लावा अशी मागणी मुंबई भाजपाकडून सध्या होत आहे. मात्र या प्रकरणावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुंबई भाजपकडून(political issue) मुंबईमधील रस्ता घोटाळाप्रकरणात SIT चौकशी लावण्याची मागणी वारंवार होत आहे. मात्र याप्रकरणी प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबईतील रस्त्याच्या घोटाळ्याची चौकशी करा हेच मी पण बोलत होतो. तसेच जी मी मागणी करत होतो, तीच मागणी आता भाजप पक्ष सुद्धा करत आहे.

कारण खोके सरकारच्या देखरेखीत मुंबईमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. मात्र आता राज्यात देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं आहे, त्यामुळे आता त्यांना स्वच्छ सरकार चालवण्याची खरोखर मोठी संधी मिळाली आहे, त्यामुळे आता भाजपला जर स्वच्छ सरकार चालवायचं असेल तर त्यांनी चौकशी पूर्ण होईलपर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यांना मंत्रिमंडळात घेऊ नये अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

दरम्यान, जोपर्यंत हे सिद्ध होत नाही की एकनाथ शिंदे, दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा त्यांचा हात नाही आणि ठेकेदाराचा देखील फायदा झाला नाही. तोपर्यंत त्यांना मंत्रिमंडळापासून त्यांना बाजुला ठेवावे. तसेच फडणवीस सरकारने हे केले तरच आम्ही समजू की हे सरकार वाशिंग मशिन सरकार नाही.

हेही वाचा :

‘हाऊसफुल 5’ च्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारला दुखापत…

Tata च्या ‘या’ दोन लोकप्रिय EV कारवर मोफत चार्जिंगची ऑफर

सावधान! पावसासंदर्भात हवामान विभागाकडून मोठी अपडेट