राष्ट्राध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘या’ निर्णयाने दिला सर्वांना धक्का

वॉश्गिंटन: डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी ( दि. 20 जानेवारी) 47 वे राष्ट्राध्यक्ष(President) म्हणून शपथ घेतील. अमेरिकेच्या संसंदेत त्यांचे दुसऱ्यांदा पुनरागमन झालं असून त्यांनी अध्यक्षपदाची सुत्रे हातात घेतली. वॉशिंग्टन डीसीमध्ये झालेल्या या अद्धाटन समारंभात प्रमुखे राजकीय व्यक्ती, अद्योगपती आणि माजी राष्ट्रापती यासोबत अनेक दिग्गज उपस्थित होते. जो बायडेन यांनी अध्यक्षपदाची सुत्रे ट्रम्प यांनी सूपूर्द केली. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

दरम्यान राष्ट्राध्यक्ष(President) झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक निर्णय घेतला असून त्यांच्या या निर्णयाने सर्वांना धक्का बसला आहे. त्यांच्या अध्यक्षतेच्या प्रारंभीच त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांनी जागतिक स्तरावर आश्चर्य व्यक्त केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 जानेवारी 2025 रोजी अमेरिकेच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्यत्वातून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाने जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे.

ट्रम्प यांनी यासंबंधित आपले मत मांडताना म्हटले आहे की, कोविड-19 महामारी आणि आंतरराष्ट्रीय आरोग्य संकटांच्या काळात WHO आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडण्यात अपयशी ठरली आहे. त्यांनी असेही म्हटले की, WHO स्वतंत्रपणे कार्य करत नाही आणि अमेरिकेवर अन्यायकारक आर्थिक भार टाकत आहे, तर चीनसारख्या देशांकडून कमी निधी स्वीकारत आहे.

या कारणामुळे हा निर्णय त्यांनी घेतला असल्याचे सांगितले. अमेरिका हा WHO ला सर्वाधिक आर्थिक मदत करणारा देश आहे. यामुळे अमेरिकेच्या बाहेर पडण्यामुळे संघटनेच्या फंडिंगवर मोठा परिणाम होईल. या निर्णयावर अनेक देश आणि तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

याशिवाय, ट्रम्प यांनी टिकटॉकसंबंधी मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेतील 17 कोटी लोक वापरणाऱ्या या प्लॅटफॉर्मच्या बंदीची अंमलबजावणी 75 दिवस पुढे ढकलण्याचा आदेश त्यांनी दिला आहे. त्यांनी म्हटले की, यामुळे त्यांच्या प्रशासनाला राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना करण्यासाठी वेळ मिळेल. तसेच लाखो अमेरिकन नागरिक वापरत असलेल्या या प्लॅटफॉर्मला अचानक बंद होण्यापासून वाचवता येईल.

ट्रम्प यांच्या या निर्णयांमुळे अमेरिकेच्या जागतिक धोरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. WHO मधून बाहेर पडणे आणि टिकटॉकबाबत घेतलेले निर्णय हे जागतिक स्तरावर चर्चेचे विषय ठरले आहेत. ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्ष(President) म्हणून सुरुवातच मोठ्या आणि धाडसी निर्णयांनी झाली आहे, जी अमेरिकेच्या धोरणांसाठी तसेच जागतिक राजकारणासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.

हेही वाचा :

जिओ सिनेमावर नाही..IND vs ENG T20 मालिका केव्हा, कुठे पाहता येणार?

कारखान्यांसाठी गोड बातमी! साखर निर्यातीला केंद्राची मंजुरी

बदलापूरची बनावट चकमक न्यायालयीन चौकशीचे निष्कर्ष