अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या (presidential)निवडणुकीतील चिन्ह अतिशय इंटरेस्टिंग आहेत. डेमोक्रेटिक पक्षाचे चिन्ह हे गाढव तर रिपब्लिकन पक्षाचे चिन्ह हे हत्ती आहे. हे चिन्ह कसे मिळाले? यामागची रोमांचक गोष्ट काय?
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी(presidential) रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार कमला हॅरीस यांच्यामध्ये कमालीची टक्कर पाहायला मिळ आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी होणाऱ्या निवडणुकीत दोन महत्त्वाचे राजकीय पक्ष असतात. रिपब्लिकन पार्टी आणि डेमोक्रेटिक पार्टी असे दोन पक्ष असून त्यांचे प्रतिकात्मक चिन्ह आणि हत्ती आणि गाढव. हे प्रतिक अमेरिकेतील राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतात. यामागे एक रोमांचक असा इतिहास आहे.
रिपब्लिकन पक्षाचे चिन्ह हत्ती असून ही चिन्ह 7 नोव्हेंबर 1874 रोजी तयार करण्यात आलं. जेव्हा प्रसिद्ध व्यंगचित्रकार थॉमस नास्ट यांनी पहिल्यांदा राजकीय व्यंगचित्रात त्याचा वापर केला. नॅस्टने हार्परच्या साप्ताहिक मासिकात “रिपब्लिकनला मतदान करताना” हत्तीचे चित्रण करणारे व्यंगचित्र प्रकाशित केले. या व्यंगचित्राने हत्ती हे रिपब्लिकन पक्षाचे चिन्ह बनवले. यामागची मुख्य कल्पना अशी होती की, हत्ती हा एक मजबूत, स्थिर आणि गौरवशाली असा प्राणी आहे, जो रिपब्लिकन पक्षाच्या धोरणांचे आणि विचारसरणीचे प्रतीक म्हणून मानले जाते. या चिन्हातून त्यांची विचारधारा अधोरेखित होते.
डेमोक्रॅटिक पक्षाचे चिन्ह गाढव आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार अँड्र्यू जॅक्सन यांना त्यांच्या विरोधकांनी “जॅकस” (गाढव) संबोधून अपमानित केले तेव्हा 1828 च्या अध्यक्षीय निवडणुकीत हे चिन्ह पहिल्यांदा उदयास आले. जॅक्सनने अभिमानाने हे अपमानास्पद टोपणनाव चिन्ह म्हणून स्वीकारले आणि त्याच्या प्रचारात गाढव वापरण्यास सुरुवात केली. थॉमस नास्ट यांनी 1870 च्या दशकात त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये गाढवाचा वापर केला, ज्यामुळे ते चिन्ह कायमस्वरूपी डेमोक्रॅटिक पक्षाशी जोडले गेले. गाढव हे डेमोक्रॅटिक पक्षाच्या साधेपणाचे, कष्टाचे आणि सामान्य लोकांप्रती असलेल्या निष्ठेचे प्रतीक आहे. या चिन्हामधून त्या पक्षाची विचारधारा अधोरेखित होते.
गाढव आणि हत्ती हे दोन्ही पक्षाची चिन्हे म्हणून अतिशय महत्त्वाची आहेत. याचा वापर राजकीय संवाद, निवडणूक, अभियान आणि मीडिया यामध्ये व्यापक प्रमाणात होत असतो. ही फक्त पक्षाची चिन्हे नसून राजकीय पक्षांच्या विचारांचा आणि सिद्धांताचे प्रतिक मानले जाते. हत्ती रिपब्लिकन पक्षाची ताकद, स्थिरता आणि कंजर्वेटिव विचारांचे प्रतिक असून गाढव हे चिन्ह डेमोक्रेटिक पक्षाचे प्रगतशील, मेहनत आणि जनसामान्यांचा पक्ष म्हणून त्याकडे पाहिले जाते.
हेही वाचा :
‘पुष्पा 2’ चा छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित ‘छावा’ चित्रपटावर परिणाम!
कॉमेडी किंग भाऊ कदम झाला ‘सिरियल किलर’?
सोन्या-चांदीचे दर आज वाढले की कमी झाले?