तापसी पन्नूचा ‘फिर आई हसीन दिलरुबा’ हा चित्रपट सध्या खूपच (lashed)चर्चेत आहे. 2021 मधील ‘हसीन दिलरुबा’चा हा सिक्वेल आहे. या चित्रपटाची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. ‘फिर आई हसीन दिलरुबा’ या चित्रपटाचे काल रात्री मुंबईत स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते.
जिथे चित्रपटातील मुख्य कलाकार(lashed) विक्रांत मॅसी, तापसी पन्नू, सनी कौशल आणि जिमी शेरगिल आले होते. अशातच आता एक तापसी पन्नूचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये या कार्यक्रमात सहभागी झालेल्या कलाकारांचे वेगवेगळे लूक बघायला मिळत आहेत.
‘फिर आई हसीन दिलरुबा’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी मुंबईत काल या चित्रपटाचे स्क्रीनिंग पार पडले. या वेळी तापसी पन्नूने लाल रंगाची साडी आणि काळ्या रंगाचा ब्लाऊज परिधान केला होता. तिचा हा लूक खूपच सुंदर दिसत होता. पण सध्या याच कार्यक्रमातील एक व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये तापसी पापाराझींवर संतप्त झाल्याचं दिसत आहे. स्क्रीनिंग संपल्यानंतर तापसी पन्नू बाहेर पडत होती आणि तिच्या कारकडे ती जात होती. मात्र, त्यावेळी तिचे फोटो काढण्यासाठी पापाराझींनी मोठी गर्दी केली. हे पाहून तापसी पन्नूला राग आला आणि तिचा संयम सुटला.
त्यावेळी ती म्हणाली की, माझ्यावर चढू नकोस, असे करून तू मला घाबरवत आहेस. असं व्हिडीओमध्ये तापसी पन्नू म्हणताना दिसत आहे. त्यानंतर पापाराझी तापसी पन्नूला सॉरी मॅडम असं म्हणू लागले. सध्या तापसी पन्नूचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. याआधी देखील अभिनेत्री अशाप्रकारे पापाराझींवर रागावताना दिसली आहे.
अभिनेत्री तापसी पन्नूचा ‘फिर आई हसीन दिलरुबा’ हा चित्रपट आज प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती आनंद एल राय, हिमांशू शर्मा, भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांनी केली आहे. या चित्रपटाचा पहिला भाग 2021 मध्ये ‘हसीन दिलरुबा’ नावाने प्रदर्शित झाला होता. जो प्रेक्षकांना खूपच आवडता होता. त्यानंतर पुन्हा एकदा या चित्रपटाचा सिक्वेल आला आहे. यामध्ये तापसीसह सनी कौशल अभिमन्यूच्या भूमिकेत आणि मृत्यूंजयच्या भूमिकेत जिमी शेरगिल दिसणार आहेत.
हेही वाचा :
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीला खिंडार?
विनेश फोगाटला सर्वात मोठा दिलासा; काही तासांतच समोर येणार निकाल
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अखेर जामीन मंजूर