अनेकदा आपण पाहतो की आंघोळीनंतर ज्या(bathing) टॉवेलने शरीर पुसतो, त्याच टॉवेलने चेहराही पुसतो. जर तुम्हीही असे करत असाल, तर ही मोठी चूक ठरू शकते. होय, असे करणे तुमच्या त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. अस्वच्छ टॉवेलमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात, त्वचा कोरडी होऊ शकते आणि संसर्गाचा धोका वाढतो, ज्यामुळे चेहऱ्याचे तेज कमी होऊ शकते.यामुळे प्रश्न निर्माण होतो की आंघोळीनंतर त्याच टॉवेलने चेहरा पुसल्यास नक्की काय होते? शरीरासाठी वापरलेल्या टॉवेलने चेहरा पुसल्याने त्वचेला कोणते हानीकारक परिणाम होऊ शकतात? चला, याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

पिंपल्स आणि त्वचेचे संसर्ग:
टॉवेलने चेहरा पुसल्याने पिंपल्स होऊ शकतात, कारण बॅक्टेरिया आणि जीवाणू टॉवेलवर जमा होतात, आणि त्याचा संपर्क त्वचेशी होतो. बहुतेक वेळा टॉवेल दररोज धुतले जात (bathing) नाही, आणि त्यामुळे ते अस्वच्छ राहू शकते. त्यामुळे, चेहऱ्याला संसर्ग होण्याचा धोका वाढतो.
कोरडी त्वचा:
टॉवेलचा वापर केल्याने त्वचेवरील नैसर्गिक तेल निघून जाते, ज्यामुळे त्वचा कोरडी होऊ शकते. मॉइश्चरायझर लावल्यानेही त्वचा गुळगुळीत किंवा मऊ वाटत नाही.
वयापूर्वीच सुरकुत्या येणे:
टॉवेलच्या वारंवार वापरामुळे त्वचेची लवचिकता कमी होऊ शकते. जाडसर टॉवेलने चेहरा पुसल्यामुळे त्वचेला आवश्यक असलेली लवचिकता कमी होऊ शकते आणि यामुळे (bathing) सुरकुत्या लवकर दिसू लागतात.

सुरक्षित वापरासाठी टिप्स:
फेस वॉश केल्यानंतर चेहरा पुसण्यासाठी नेहमी स्वच्छ आणि मऊ टॉवेल किंवा टिश्यू पेपर वापरणे योग्य आहे. चेहऱ्याला जोरात टॉवेलने घासू नका. चेहऱ्यावरील पाणी हलक्या थापाट्यांनी हाताने कोरडे करा, जेणेकरून त्वचेचा नाजूक पोत सुरक्षित राहील
हेही वाचा :
मजा बन गई सजा! घिबली ट्रेंडमुळे गोपनीतेला धोका, सायबर हल्ला होणार…
सूनबाई माझं म्हणणं नीट ऐकं लग्नाच्या दिवशी सासऱ्याने होणाऱ्या सूनेकडे अशी मागणी केली
महाराष्ट्र हादरला! बायको माहेरी गेल्याने सटकली; नवऱ्याने पत्नी आणि सासूला जिवंत पेट
मजा बन गई सजा! घिबली ट्रेंडमुळे गोपनीतेला धोका, सायबर हल्ला होणार…
अंबाबाईच्या दर्शनाआधी पंचगंगेत उतरले; पाण्यात उतरताच धाप लागली आणि… तरुणासोबत भयंकर घडलं