मुंबई: बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री(actor) करीना कपूर खान आपल्या बिनधास्त बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच एका मुलाखतीत करीनानेसोशल मीडियावर सेलिब्रिटींना मिळणाऱ्या अनावश्यक लक्षाबद्दल मत व्यक्त करताना सांगितलं की, लोकांनी सेलिब्रिटींकडे फारसे लक्ष न देता आपलं वैयक्तिक आयुष्य आणि करिअरवर लक्ष केंद्रित करावं.
करीना म्हणाली, “आजच्या काळात लोक सोशल मीडियावर जास्त वेळ घालवत आहेत आणि सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्यात अडकून जात आहेत. त्याऐवजी त्यांनी स्वतःच्या आयुष्यात कशावर लक्ष केंद्रित करायचं आहे, याचा विचार करायला हवा.”
तिने पुढे सांगितलं की, सेलिब्रिटीही सामान्य माणसांसारखेच आहेत आणि त्यांना त्यांच्या आयुष्याचा हक्क आहे. त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर सतत टीका किंवा चर्चा करणं गरजेचं नाही.
या वक्तव्यामुळे करीनाने सेलिब्रिटी आणि फॅन्स यांच्यातील नात्याबद्दल मोकळेपणाने बोलत आपलं मत मांडलं आहे. करीनाच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा तिच्या स्पष्टवक्तेपणाचं दर्शन घडवलं आहे.
हेही वाचा:
“प्रेम त्रिकोणात अडथळा ठरलेला पोलीस सब इन्स्पेक्टर; लेडी कॉन्स्टेबलने अशा प्रकारे सोडवला पेच!”
वडिलांच्या मृत्यूने आभाळ कोसळलं, मलायकाचा पहिला VIDEO समोर
सणा सुदीच्या मुहूर्तावर पुन्हा ग्राहकांना झटका