…तोपर्यंत EVM चं रिझल्ट बटन दाबू देऊ नका

देशात सध्या निवडणुकांचा अखेरचा टप्पा(stage) सुरू आहे. आतापर्यंत सहा टप्प्यांत मतदान पार पडलं असून आता फक्त सातवा टप्पा शिल्लक राहिला आहे. दरम्यान, ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह कायम आहे. अशातच राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल यांनी एक विशेष तक्ता तयार करत ईव्हीएमच्या मतमोजणीविषयी एक व्हिडीओ शेअर केला आहे.

मतमोजणीवेळी हजर राहणाऱ्या पक्षाच्या प्रतिनिधींसाठी हा व्हिडीओ सिब्बल यांनी शेअर केला आहे. सिब्बल यांनी या व्हिडीओद्वारे मतदारांचा ईव्हीएमसंबंधी विश्वास वाढावा यासाठी काही खबरदारी घ्यायला सांगितली आहे. ते या व्हिडीओत म्हणतात की, ईव्हीएम मशीनशी छेडछाड झाल्याचा आरोप होताना दिसतो आहे. पण आपल्याला छेडछाडीची कोणतीही शक्यता उरणार नाही, अशाच प्रकारे काम करायचं आहे. वास्तविक ईव्हीएमच काय कोणत्याही मशिनसोबत छेडछाड केली जाऊ शकते. (stage)

पण, आपल्याला मतदारांना हा विश्वास द्यावा लागेल की त्याने दिलेलं मत हे त्याच्या मनातील उमेदवारालाच गेलं आहे. त्यासाठी मी एक तक्ता तयार केला आहे, असं सिब्बल या व्हिडीओत म्हणतात.
ते पुढे सांगतात की, या तक्त्यात मी कंट्रोल यूनिट नंबर, बॅलेट यूनिट नंबर आणि व्हीव्हीपॅट आयडी नमूद केला आहे. त्यासोबत पेपर सील्स असतील. त्यानंतरचा तिसरा स्तंभ महत्त्वाचा आहे. तिसऱ्या स्तंभात चार जून 2024 लिहिण्यात आलं आहे आणि मशीन उघडण्याची वेळही दिली आहे. या वेळात जर फरक आढळला तर कळेल की मशीन आधीच उघडण्यात आली होती. तसंच, कंट्रोल यूनिटचा क्रमांकही इथे लिखित स्वरुपात नमूद असेल. त्याची पडताळणी करावी लागेल, असं सिब्बल म्हणाले.

दोन गोष्टींबाबत सावधगिरी बाळगावी लागेल, ती म्हणजे जोपर्यंत वरील सर्व बाबींची पडताळणी होत नाही आणि जर त्यावेळी वेळेतील फरक दिसत असेल तर आधी खात्री करून मगच ईव्हीएमचं रिझल्टचं बटन दाबावं, अन्यथा दाबू देऊ नका, असं आवाहनही सिब्बल यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना केलं आहे.

हेही वाचा :

राज्यात अनेक भागांत वादळी वाऱ्याचा धुमाकूळ, पाच जणांचा मृत्यू

दहावीचा आज निकाल! विद्यार्थ्यांना ‘या’ संकेतस्थळावरून पाहाता येणार निकाल

ताडोबात पर्यटकांनी वाघाला घेरले! सरकारी यंत्रणा हादरली, वन्यप्रेमी चिंतेत