मराठी ‘नॉट वेलकम’ म्हणणाऱ मत देऊ नका; अभिनेत्री रेणुका शहाणे संतापल्या

अलीकडेच एका गुजराती कंपनीची गिरगाव येथील कार्यालयासाठी नोकरभरतीसाठीची लिंक्डिनवरील(linkedin) जाहिरात व्हायरल झाली होती ज्यात ‘येथे मराठी लोकांचे स्वागत नाही,’ असे ठळकपणे नमूद केले होते.

या जाहिरातीनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. आता अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीदेखील या जाहिरातीवर प्रतिक्रिया दिली असून मराठी माणसांना ’नॉट वेलकम’ म्हणणाऱया लोकांना कृपया मत देऊ नका, असे आवाहन त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे केले आहे.(linkedin)

‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये रेणुका शहाणे यांनी म्हटलेय, मराठी ‘नॉट वेलकम’ म्हणणाऱया लोकांना कृपया मत देऊ नका… मराठी लोकांना घरे न देणाऱया लोकांचे समर्थन करणाऱया उमेदवारांना कृपया आपले बहुमूल्य मत देऊ नका… ज्यांच्या कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखले जाते, अशा लोकांचे समर्थन करणाऱया उमेदवारांना किंवा पक्षाला कृपया मत देऊ नका.

पोस्टच्या शेवटी त्यांनी म्हटलेय, कुठल्याही जाती, धर्म किंवा भाषेच्या विरुद्ध मी नाही, पण जे आपल्याच महाराष्ट्रात, आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा मान ठेवत नाहीत अशा लोकांना, शांतपणे, मत न देऊन त्यांची चूक दाखवून दिलीच पाहिजे. ऐन लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना रेणुका शहाणे यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय.

हेही वाचा :

कोल्हापूर लोकसभेत याराना सेफ ..!

CSK ला मोठा धक्का! संघातील प्रमुख फलंदाज संपूर्ण स्पर्धेतून बाहेर

महाराष्ट्र हादरलं! आजोबाकडून नातीवर अत्याचार, मुलगी ९ महिन्यांची गरोदर