सांगली : राज्यामध्ये कुस्तीपटू आणि त्यांच्या संबंधित वाद चर्चेचा विषय ठरला आहे. काही दिवसांपूर्वी झालेली महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा शेवटच्या निर्णयामुळे चर्चेत आले आहे(hunger strike). कुस्तीपटू शिवराज राक्षे याने पंचाच्या निर्णयाचा विरोध करत लाथ घातली होती.

याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर राक्षेवर तीन वर्षाची कारवाई करण्यात आली. यावेळी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. यानंतर आता पुन्हा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी उपोषणाचा(hunger strike) आक्रमक पवित्रा घेतला आहे.
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी कुस्तीपटूंसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्रातील अनेक कुस्तीपटूंनी त्यांना पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्र केसरी ही कुस्ती क्षेत्रातील सर्वात मानाची स्पर्धा आहे. या स्पर्धेचा दर्जा उंचावण्यासाठी या स्पर्धेतील राजकारण दूर करण्याची मागणी चंद्रहार पाटील यांनी केला आहे. महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा वर्षातून एकदाच व्हायला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागणीसाठी ते सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत. त्यामुळे चंद्रहार पाटील यांच्या भूमिकेकडे संपूर्ण कुस्ती विश्वाचे लक्ष लागले आहे.
कुस्तीपटूच्या हक्कासाठी चंद्रहार पाटील हे आखाड्यामध्ये उतरले आहेत. त्यांनी यावेळी गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, “कुस्ती ही आपली जुनी संस्कृती आहे. पण एकाच वर्षाच चार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होत असताना शासन त्याकडे का लक्ष्य देत नाही? असा सवाल चंद्रहार पाटील यांनी विचारला आहे.

2025 मध्ये फेब्रुवारी महिन्यात एक स्पर्धा झाली. तर दुसरी आता मार्च महिन्यात होत आहे. तर इतर दोन स्पर्धा या वर्षाअखेरीस डिसेंबर महिन्यात होईल. म्हणजे एका वर्षात चार महाराष्ट्रा केसरी स्पर्धा होत आहे. हा तर या स्पर्धेचा खेळ लावला आहे, असा आरोप चंद्रहार पाटील यांनी केला.
पुढे त्यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा सातत्याने भरवत असल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. चंद्रहार पाटील म्हणाले की, एका वर्षात चार चार महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहे. यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेनंतर झालेला वाद अद्याप संपलेला नाही. तर डिसेंबर महिन्यात पुन्हा महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याचे नियोजन सुरू आहे. त्यामुळे दोन -दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेणे हे चुकीचे आहे. संघटनात्मक राजकारण दूर करून या स्पर्धेचे होत असलेले अवमूल्यन कमी करण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे.
हेही वाचा :
मॉर्निंग वॉकला बाहेर पडत असाल तर आत्ताच व्हा सावध धक्कादायक माहिती समोर
लंडनमध्ये चित्रीत झालेलं श्रीजय क्रिएशन प्रस्तुत ‘प्रेमाची शिट्टी’ हे रोमँटिक गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर गाणं व्हायरल !
लव्ह जिहाद, कायदा हवाच देवेंद्र फडणवीसांचं सुतोवाच