पुणे (pune)कल्याणीनगर हिट ऍण्ड रन प्रकरणातील आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटकेत असलेला फॉरेन्सिक विभागाचा डॉक्टर अजय तावरे याच्यावर मिंधे सरकारचा वरदहस्त आहे. त्यामुळेच तो ससून रुग्णालयात मोकाट असल्यासारखा वागत होता, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.
अंबादास दानवे यांनी आज ‘अजिंक्यतारा’ या शासकीय निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी डॉ. तावरे आणि मिंधे सरकारच्या संबंधांची कुंडलीच मांडली. किडनी रॅकेट प्रकरणात 2022 साली वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी ससून प्रशासनाला पत्र पाठवून डॉ. तावरे यांना अधीक्षकपदावरून कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले होते. तरीही ते अवयव प्रत्यारोपण समितीत सक्रिय होते, असे दानवे यांनी सांगितले.(pune)
2023 मध्ये वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन आणि वैद्यकीय सचिव अश्विनी जोशी यांनी वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक अशा 16 जणांच्या बदलीचा निर्णय घेतला होता. ती फाईल मान्यतेसाठी मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवली गेली होती. त्यातील 15 जणांच्या बदल्या झाल्या, पण डॉ. तावरे याची बदली झाली नाही. तावरे याची बदली कोणी रोखली आणि त्याला कुणाचे संरक्षण आहे, असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला.
हेही वाचा :
इचलकरंजीत विजेच्या धक्क्याने शोरूममधील कर्मचाऱ्याचा मृत्यू
ठाकरे गटाच्या नेत्याकडून बाजार समितीच्या सभापतीला मारहाण
करण जोहरनं लग्न का केलं नाही? कारण सांगत म्हणाला…