चंदीगड : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी आधुनिक(residence) काळातील द्रौपदीचं वस्त्रहरण झालं, असं वादग्रस्त विधान भाजप नेते शेहजाद पुनावाला यांनी केलं आहे. पंजाबच्या चंदीगड इथं पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी याप्रकरणावरुन आम आदमी पार्टीसह इंडिया आघाडीवरही टीकास्त्र सोडलं. त्याचबरोबर त्यांनी इतर अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत.
पुनावाला म्हणाले, “गेल्या 10 दिवसांत तुम्ही आधुनिक(residence) काळातील ‘द्रौपदीचं वस्त्रहरण‘ पाहिलं असेल, हे अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी घडलं. त्यामुळं केजरीवालांच्या या निवासस्थानाला आता ‘शोषण-महल’ असं म्हटलं जातं. सन २०१२ मधील निर्भया आंदोलनातून आपला जन्म झाल्याचा दावा करणारा आम आदमी पक्ष आता बिभव कुमार यांच्या पाठीशी उभा आहे, ज्यांच्यावर गंभीर आरोप आहेत.
बिभव कुमार यांच्यासोबत असल्यानं केवळ अरविंद केजरीवालच नव्हे तर संपूर्ण इंडिया आघाडीनं स्वाती मालिवार प्रकरणावर का मौन बाळगलं आहे? इंडिया आघाडीनं हा आपचा अंतर्गत मामला असल्याचं म्हटलं आहे.
काँग्रेसही या विषयावर शांत आहे, कारण या पक्षानंही ज्या प्रकारे महिलांचं शोषण केलं आहे. त्यामुळं आता स्वतः काँग्रेसची एक एक महिला कार्यकर्ता मग ती राधिका खेडा किंवा दीपा दुबे आहेत, त्यांनीही सांगितलं की काँग्रेसच्या कार्यालयात काय काय दुष्कृत्य घडू शकतं.
हेही वाचा :
इचलकरंजी पंचगंगा पूलावर भरधाव ट्रकची पलटी…
‘फेक बेबी बंप’ म्हणून झालेल्या ट्रोलिंगनंतर दीपिका आली समोर; Video
नातेवाईकांना फोन करून तरुणाची ‘पंचगंगे’त उडी…