उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी(summer)संतुलित ठेवणे खूप महत्त्वाचे असते. उन्हामुळे होणारी डिहायड्रेशन, थकवा आणि आळस टाळण्यासाठी हायड्रेटिंग आणि पौष्टिक पेय सेवन करणे गरजेचे आहे. अनेकजण उन्हाळ्यात कोल्ड्रिंक्स किंवा एनर्जी ड्रिंक्सला प्राधान्य देतात, पण त्याऐवजी नैसर्गिक आणि आरोग्यदायी ज्यूस हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.बीट, काकडी आणि भोपळ्याचा रस हे उत्तम पर्याय आहेत, कारण ते शरीराला आतून पोषण देतात आणि त्वचेला चमकदार बनवतात. तर मग जाणून घेऊया की उन्हाळ्यात बीट, काकडी आणि भोपळ्याचा रस कसा फायदेशीर ठरू शकतो. आणि तो बनवण्याची योग्य पद्धत कोणती आहे.

१. बीटरूटचा रस
बीटरूटला सुपरफूड म्हणून ओळखले जाते कारण त्यामध्ये भरपूर पोषक तत्त्वे असतात. उन्हाळ्यात त्याचा रस पिणे विशेषतः फायदेशीर ठरते. बीटरूटचा रस पिल्याने शरीर डिटॉक्स करते, रक्तदाब नियंत्रीत राहते, उर्जेची पातळी वाढते, हिमोग्लोबिन वाढवतो, त्वचा चमकदार ठेवतो, थकला आणि अशक्तपणा दूर करतो.
बीटरूटचा रस बनवण्याची सोपी पद्धत:
बीट नीट धुऊन सोलून लहान तुकडे करा. मिक्सर किंवा ज्यूसरमध्ये हे तुकडे टाका. त्यात आले आणि थोडेसे पाणी घाला. सर्व घटक एकत्र बारीक करून रस तयार करा. रस (summer)गाळून एका ग्लासमध्ये ओता. त्यात लिंबाचा रस घाला आणि चांगले हलवून घ्या. रस थंड करून प्या आणि ताजेतवाने राहा.
२. काकडीचा रस
उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळण्यासाठी आणि शरीराला थंड ठेवण्यासाठी काकडी हा एक उत्कृष्ट पर्याय आहे. काकडीमध्ये ९०% पेक्षा जास्त पाणी असते. काकडीमध्ये जास्त प्रमाणात पाणी असल्याने उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवते. त्वचेतील विषारी पदार्थ काढून टाकते आणि तिला चमकदार बनवते. कमी कॅलरी आणि फायबरयुक्त असल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुरळीत ठेवते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते. काकडीचा थंड गुणधर्म असल्याने उन्हाळ्यात उष्णता कमी करते आणि शरीराला ताजेतवाने ठेवते.
काकडीचा रस कसा बनवायचा?
काकडी स्वच्छ धुवून छोटे तुकडे करा. त्यात ताजे पुदिन्याचे पाने आणि आवश्यकतेनुसार पाणी घाला. मिक्सरमध्ये बारीक करून रस तयार करा. तयार रस गाळून एका ग्लासमध्ये ओता. त्यात चवीनुसार लिंबाचा रस आणि काळे मीठ मिसळा. सकाळी किंवा दुपारी हा रस प्या, यामुळे शरीर थंड राहील आणि ताजेतवाने वाटेल.

३. भोपळ्याचा रस
भोपळ्याचा रस हा अत्यंत पौष्टिक आणि आरोग्यासाठी लाभदायक मानला जातो. उन्हाळ्यात शरीरातील उष्णता नियंत्रित ठेवते. बद्धकोष्ठता, अपचन आणि गॅसच्या तक्रारी दूर करते. (summer)कमी कॅलरी आणि उच्च फायबरयुक्त असल्यामुळे वजन नियंत्रणास मदत करते. शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकून यकृत आणि मूत्रपिंडाचे आरोग्य राखते. पोटातील आम्लता नियंत्रित ठेवते. हृदयाचे आरोग्य सुधारते आणि हृदयरोगाचा धोका कमी करते.
भोपळ्याचा रस कसा बनवायचा?
भोपळा सोलून त्याचे लहान तुकडे करा. पुदिना, आले आणि थोडे पाणी घालून ब्लेंडरमध्ये बारीक करा. तयार मिश्रण गाळून एका ग्लासमध्ये ओता. त्यात लिंबाचा रस घाला आणि चांगले मिसळा. हा रस सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यास अधिक फायदे मिळतात.
हेही वाचा :
“कराड” प्रवृत्ती कडून “व्यवस्थे” चीही हत्या!
“उर्फीचे व्हिडीओ पाहून माझा मुलगा म्हणाला…”; चित्रा वाघ पहिल्यांदाच बोलल्या
चहावाल्याचा धक्कादायक निर्णय! सुसाईड नोट थेट आमदाराच्या कार्यालयात