दुबईमध्ये झालेल्या पावसामुळे अनेक( Mall)शहरांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. एरपोर्ट पाण्याखाली गेली. मेट्रो स्टेशन, मॉल, रस्ते या सर्व ठिकाणी केवळ पाणीच पाणी आहे
दुबई हे नाव जरी काढलं तरी आपल्या डोक्यात मोठमोठ्या ईमारती, महागड्या गाड्या, श्रीमंत व्यक्ती असं काहीसं चित्र समोर उभं राहतं. मात्र सध्या दुबईचं नाव चर्चेत आहे ते म्हणजे पावसाने घातलेल्या हाहाकारमुळे. अवघ्या काही तासांच्या पावसाने श्रीमंतांची ही दुबई वाहून गेली, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. (Mall)पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या दुबईत आकाशातून एवढ्या पाण्याचा वर्षाव झाला की या शहराला जणू महासागरच रूप आलेलं दिसून आलं.
दुबईमध्ये झालेल्या पावसामुळे अनेक शहरांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. एरपोर्ट पाण्याखाली गेली. मेट्रो स्टेशन, मॉल, रस्ते या सर्व ठिकाणी केवळ पाणीच पाणी आहे. यामुळे शाळाही बंद कराव्या लागल्या. गेल्या 24 तासांत दुबईत वर्षभरात जितका पाऊस पडतो तितका पाऊस पडला आहे. मुसळधार पावसानंतर दुबईत पूर आला असून ही एक मोठी नैसर्गिक आपत्ती आहे.
दुबई हे नाव जरी काढलं तरी आपल्या डोक्यात मोठमोठ्या ईमारती, महागड्या गाड्या, श्रीमंत व्यक्ती असं काहीसं चित्र समोर उभं राहतं. मात्र सध्या दुबईचं नाव चर्चेत आहे ते म्हणजे पावसाने घातलेल्या हाहाकारमुळे. अवघ्या काही तासांच्या पावसाने श्रीमंतांची ही दुबई वाहून गेली, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या दुबईत आकाशातून एवढ्या पाण्याचा वर्षाव झाला की या शहराला जणू महासागरच रूप आलेलं दिसून आलं.
एका वर्षाचा पाऊस केवळ 24 तासांत?
UAE मध्ये वर्षभर तापमानाची नोंद घेतली तर याठिकाणी उष्णता असते. यावेळी कमाल तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत असतं. याशिवाय तिथे पाण्याची कमतरता आहे. यामुळे सरकार दरवर्षी क्लाउड सीडिंग म्हणजेच कृत्रिम पावसाची मदत घेतात. यंदाच्या वेळी दुबईतील आपत्तीचे कारण या कृत्रिम पाऊस असल्याचं म्हटलं जातंय.
दुबई प्रशासनाने सोमवारी आणि मंगळवारी क्लाउड सीडिंगसाठी विमाने उडवली होती. या विमानांनी दोन दिवसांत एकूण सात वेळा उड्डाण केलं. UAE मध्ये रेन एन्हांसमेंट प्रोग्राम चालतो. शास्त्रज्ञ प्रत्येक वेळी यूएईच्या वातावरणाची भौतिक आणि रासायनिक चाचणी घेतात. ज्यामध्ये Aerosol आणि प्रदूषणकारी घटकांची विशेषत: चाचणी केली जाते. यानंतर ढग तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते.
यानंतर क्लाऊड सीडिंग किती वेळा करायचं याबाबत माहिती घेण्यात येते. यावेळी विमानं एका विशिष्ट उंचीपर्यंत गेल्यानंतर chemicals सोडण्यात येतात जेणेकरून पाऊस पडेल. संयुक्त अरब अमिराती दरवर्षी क्लाउड सीडिंगसाठी याच प्रक्रियेचा अवलंब केला जातो. मात्र यावेळी शास्त्रज्ञांना या प्रक्रियेत अनियमितता असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. क्लाउड सीडिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनांवरही प्रश्न उपस्थित केले जात असल्याची माहिती आहे.
कृत्रिम पाऊस कसा पाडला जातो?
कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी शास्त्रज्ञ सिल्व्हर आयोडाइड, कोरडा बर्फ आणि मीठ आकाशातील ठराविक उंचीवर जाऊन ढगांमध्ये सोडण्यात येतं. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी आकाशात किमान 40 टक्के ढग असणे आवश्यक आहे. ज्यावेळी ढगांमध्ये पाण्याचे प्रमाण किंवा आर्द्रतेचा अभाव असतो तेव्हा cloud seeding योग्य पद्धतीने होऊ शकत नाही.
हेही वाचा :
एकट्या बटलरने पाजलं तगड्या कोलकाताला पाणी,
शोभा बच्छाव रोखणार सुभाष भामरेंची हॅटट्रीक?
कोकणात पुढील 24 तासांत उष्णतेची लाट;