सांगली : हळदीला सोन्याचे दिवस आल्याने यंदा हळदीच्या बियाणे दरात दुप्पटीहून वाढ

सांगली : हळदीला सोन्याचे दिवस आल्याने यंदा हळदीच्या(turmeric) बियाणे दरात दुप्पटीहून वाढ झाली आहे. मागील वर्षी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागात हळदीचे लागवड कमी झाल्याने हळदीचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे हळदीच्या बियाणे दरात वाढ झालीय .आता सांगली बाजारात आंध्र प्रदेशमधील सेलमहून हळदीचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध झाले असून गेल्या वर्षी ३ हजार 500 रूपये असलेला दर यंदा 8 हजार 400 रूपये क्विंटलवर पोहोचला आहे.

अक्षयतृतीया झाल्यानंतर हळद(turmeric) लागवडीची धामधूम सुरू होते. यंदा अक्षय तृतीया झाल्यानंतर हळद लागवडीची तयारी सुरू झाली असली तरी उन्हाळी पावसाचे प्रमाण कमी आहे. हळदीला यंदा क्विंटलला सरासरी 17 हजार 500 रूपयांचा दर मिळाला असून यंदा दराचा विक्रम नोंदवत हळदीने 75 हजार दराचा कळसही गाठला होता. यामुळे यंदा हळद लागवड वाढण्याची शक्यता गृहित धरून हळदीचे सुमारे 200 ते 250 टन बियाणे सेलमहून मागविण्यात आले आहे.

गेल्यावर्षी हळद बियाणाचा दर तीन हजार ते साडेतीन हजार रूपये क्विंटल होता. यंदा मात्र, हळदीचे बियाणेच अल्प प्रमाणात उपलब्ध आहे. कारण हळदीला चांगला दर मिळाल्याने अनेक शेतकर्‍यांनी हळदीचे बियाणे मोडले असल्याने बाजारात अथवा खासगी शेतकर्‍यांकडे हळदीचे बियाणे अल्प प्रमाणात आहे. यंदा बियाणे अल्प असले तरी गतवर्षाचा अल्प पावसामुळे हळद लागवडीचे प्रमाण कमी राहण्याचीच शक्यता आहे.

अक्षय तृतियेला लागवड करून पिकाला सलग दोन ते तीन पाणी देण्यासाठी विहीरीत पाणीच उपलब्ध नाही. तरीही ताकारी, म्हैसाळ सिंचन प्रकल्पाअंतर्गत असलेल्या क्षेत्रात हळद लागवडीला सुरूवात झाली आहे. एकरी दहा ते बारा क्विंटल बियाणे लागत असल्याने बियाणावरच यंदा 80 हजार ते एक लाख रूपये खर्च येणार असल्याने अनेक शेतकरी हळद लागवडीकडे पाठ फिरवण्याची चिन्हे दिसत असल्याचे सांगण्यात आले. सांगलीच्या बाजारात यावर्षी हळदीला चांगला दर मिळाला असून पाच ते साडेपाच लाख पोती हळदीची खरेदी-विक्री झाली आहे. हळदीच्या खरेदी विक्रीमध्ये यंदा सुमारे साडेचारशे कोटींची उलाढाल झाली आहे.

हेही वाचा :

एका दिवसांत धावून आली लक्ष्मी; या शेअरने केले मालामाल

RCB आणि CSK च्या चाहत्यांमध्ये ‘दे दणादण’, तुफान हाणामारीचा Video Viral

बिग बॉस १७’ विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू