केंद्रीय अर्थसंकल्पात सोने- चांदीच्या दरांबाबत मोठी घोषणा(silver price) करण्यात आली होती. यामध्ये सर्व महागड्या धातुंवरील सीमा शुल्क कमी होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. ही घोषणा होताच सोने-चांदीचा भाव गडगडला. दुसर्या दिवसापासून लगेचच सोने-चांदीचे दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे. भाव कोसळले असून आज शनिवारपर्यंत संपूर्ण आठवडाभरात सोने 5, तर चांदीत ११ हजार रुपयांनी खाली घसरली आहे.
गुडरिटर्नस या साईटवर आलेल्या माहितीनुसार, आज देखील सोने-चांदीचा(silver price) भाव कोसळला आहे. त्यामुळे आजच्या किंमती काय आहेत? प्रति तोळा सोन्याचा भाव काय आहे? याची माहिती जाणून घेऊ.
२२ कॅरेट १०० ग्राम सोन्याचा भाव १०० रुपयांनी खाली घसरला आहे. त्यामुळे आज १०० ग्राम सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला ६,३१,४०० रुपये मोजावे लागतील. तर १० ग्राम सोन्याचा भाव ६३,१४० रुपये आहे. ८ ग्राम सोन्याचा भाव ५०,५१२ रुपये आहे आणि १ ग्राम सोन्याचा भाव ६,३१४ रुपये आहे.
आज २४ कॅरेट सोन्याचा भाव सुद्धा कमी झाला आहे. यामध्ये १०० ग्राम सोन्याची किंमती ६,८८,७०० रुपये आहे. तर १० ग्राम सोन्याची किंमत ६८,८७० रुपये. ८ ग्राम सोन्याचा भाव ५५,०९६ रुपये आहे. तसेच १ ग्राम सोन्याचा भाव ६,८८७ रुपये आहे.
आज १८ कॅरेटचा भाव ५,१६,६०० रुपये आहे. तर १० ग्राम सोन्याचा भाव आज ५१,६६० रुपये. ८ ग्राम सोन्याचा भाव आज ४१,३२८ रुपये आहे आणि १ ग्राम सोन्याचा भाव ५,१६६ रुपये आहे.
विविध शहरांतील १ ग्राम सोन्याच्या किंमती
मुंबईमध्ये २२ कॅरेट ६,२९९ रुपये आणि २४ कॅरेट ६,८७२ रुपये.
पुण्यामध्ये २२ कॅरेट ६,२९९ रुपये आणि २४ कॅरेट ६,८७२ रुपये.
कोलकत्ता २२ कॅरेट ६,२९९ रुपये आणि २४ कॅरेट ६,८७२ रुपये.
मेरठमध्ये २२ कॅरेट ६,३१४ रुपये आणि २४ कॅरेट ६,८८७ रुपये.
लुधियाना २२ कॅरेट ६,३१४ रुपये आणि २४ कॅरेट ६,८८७ रुपये.
लखनऊमध्ये २२ कॅरेट ६,३१४ रुपये आणि २४ कॅरेट ६,८८७ रुपये.
प्रति किलो चांदीचा भाव सुद्धा १०० रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे आज चांदी ८४,४०० रुपये प्रति किलो आहे. संपूर्ण देशातील विविध शहरांमध्ये देखील चांदीचा भाव हाच असणार आहे.
हेही वाचा :
3 मजली इमारत कोसळली; पहाटेच्या घटनेत बचाव कार्य सुरू
राज ठाकरेंचा सल्ला: ‘अंत्यसंस्कारात लाकडांचा वापर टाळा’, हिंदू धर्मीयांची प्रतिक्रिया
शरद पवारांच्या भूमिकेवर मराठा आरक्षण आंदोलकांचा दबाव; रामा हॉटेलबाहेर तणाव, पोलिस बंदोबस्त वाढवला