घरातीलच पदार्थ खाऊन आणा ब्लड प्रेशर नियंत्रणात

शरीरातील रक्तदाबाची(blood pressure) स्थिती हृदयासोबतच मेंदूचे हे काम सुरळीत करते. हृदय आणि मेंदूचे आरोग्य चांगले राहण्यासाठी रक्तदाब नियंत्रणात राहणे महत्त्वाचे आहे. आजकाल ब्लड प्रेशरची समस्या सामान्य झाली आहे.

बदलती जीवनशैली, पोषक आहाराचा अभाव, अपुरी झोप आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाढता ताणतणाव ही वाढत्या ब्लड प्रेशरची(blood pressure) कारणे आहेत. शरीरातील मिठाचे प्रमाण वाढल्यास उच्च रक्तदाबाचा त्रास होतो. उच्च रक्तदाबामुळे हृदयासंबंधित आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या आहारात आजपासूनच ‘या’ पदार्थांचा समावेश करावा.

ब्रोकोली
हृदयासंबंधित अनेक आजारांवर ब्रोकोली रामबाण उपाय आहे. ब्रोकोलीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.

टॉमेटो
टॉमेटोमधील पोषक घटकांमुळे रक्तवाहिन्याचे काम सुरळीत पार पडते. टॉमेटो घरोघरी सहज उपलब्ध असल्यामुळे रोज सॅलड खावे. यामुळे हृदयाचे आरोग्य देखील उत्तम राहते.

पालेभाज्या
पालेभाज्या या पोषक घटकांचा खजिना असतात. यामुळे रोजच्या आहारात एक पालेभाजी खावी. यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास होत नाही.

डार्क चॉकलेट
डार्क चॉकलेट अँटीऑक्सिडंटने समृद्ध आहे. यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो. डॉक्टरही बीपीच्या रुग्णांना चॉकलेट सोबत ठेवण्याचा सल्ला देतात.

स्ट्रॉबेरी
स्ट्रॉबेरी महाग जरी असली तरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. स्ट्रॉबेरीचे सेवन रोज केल्यास रक्तदाब नियंत्रित राहतो.

डाळी
सर्वात जास्त प्रोटीन आणि मिनरल डाळींमध्ये उपलब्ध असते. त्यामुळे नियमित डाळ प्यावी. तसेच डाळीचे पाणी व्हिटॅमिनयुक्त असते. ज्यामुळे आपले हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

गाजर
गाजरमध्ये फेनोलिक ॲसिड असते. जे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते. त्यामुळे रोज दोन्ही वेळी जेवणासोबत गाजरचे सॅलड खावे.

चिया सीड्स
चिया सीड्समध्ये पोटॅशियम, मॅगनेशियम , फायबर आणि व्हिटामिन्सने प्रमाण भरपूर असते. यांचे सेवन केल्यास उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.

वेलची
छोट्या वेलचीमध्ये अँटीऑक्सिडंटचे मोठे प्रमाण असते. ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. वेलचीमुळे कोलेस्ट्रॉल पातळी नियंत्रणात राहून हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

केळी
केळीमध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम आढळते. जे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते. इलायची केळीचे सेवन केल्यास रक्तवाहिन्या निरोगी राहतात.

टीप : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

हेही वाचा :

Netflix युजर्ससाठी महत्त्वाची बातमी, लवकरच फ्री सेवा सुरू होणार?

अजित पवारांच्या अडचणी वाढणार? शिखर बँक घोटाळा प्रकरणात क्लीन चीटला ईडीचा विरोध 

लक्ष्मण हाके आणि आबासाहेब वाघमारे यांची अभिवादन यात्रा स्थगित, पुन्हा सुरुवात तारखेला