दररोज एक संत्री खाल्ल्याने Depression चा धोका 20% होणार कमी

गेल्या काही वर्षांपासून खूप कमी वयात लोकांवर ताण वाढतोय. कामाचं तणाव, जगातील अव्वल राहण्याची स्पर्धा, धावपळ यामुळे हल्ली लोक डिप्रेशनचे(depression) शिकार होत आहेत. नुकताच हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमधील संशोधकांनी केलेल्या एका नवीन अभ्यासानुसार याबद्दल उपाय समोर आला आहे. या अभ्यानुसार दररोज एक संत्र खाल्ल्याने नैराश्याचा धोका 20 टक्के कमी होतो. हा अभ्यास मायक्रोबायोम नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

या संशोधनातून असं समोर आलं की संत्र्यासारखी लिंबूवर्गीय फळे शरीरात फेकल बॅक्टेरियम प्रुस्नित्झी नावाच्या एका विशेष बॅक्टेरियाच्या उपस्थितीला प्रोत्साहन देतात, ज्यामुळे मूड सुधारणारे हार्मोन्स सेरोटोनिन आणि डोपामाइनच्या उत्पादनावर परिणाम होतो. यामुळे व्यक्तीचा मूड सुधारतो आणि नैराश्याचा धोका कमी होण्यास मदत मिळते.

नैराश्य आलं हे कसं ओळखाल?
सततच्या नकारात्मक भावना, वर्तनातील बदल आणि काही शारीरिक लक्षणे पाहिल्यास स्वतःमध्ये किंवा इतरांमध्ये नैराश्य(depression) असल्याचे दिसून येतं. नैराश्यात, एखाद्या व्यक्तीला सतत दुःख, कामांमध्ये रस कमी होणे, भूक किंवा झोपेच्या सवयींमध्ये बदल, जास्त थकवा आणि लक्ष केंद्रित करण्यात किंवा निर्णय घेण्यात अडचण येणे असे अनुभव त्यांना येतात. जर ही लक्षणं दोन आठवडे किंवा त्याहून अधिक काळ दिसून येत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्वाचे ठरणार आहे.

1 लाख लोकांवर करण्यात आला अभ्यास
या संशोधनात 1 लाखाहून अधिक महिलांच्या आहार आणि आरोग्याशी संबंधित डेटाचे विश्लेषण करण्यात आले. निकालांमध्ये असे आढळून आले की केवळ संत्री, लिंबू, हंगामी फळे इत्यादी लिंबूवर्गीय फळांच्या सेवनाने नैराश्याचा धोका कमी झाला, तर सफरचंद आणि केळीसारख्या इतर फळांवर असा कोणताही परिणाम दिसून आला नाही. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, लिंबूवर्गीय फळांमध्ये आढळणारे घटक विशिष्ट प्रकारच्या आतड्यांतील बॅक्टेरियांना प्रोत्साहन देतात ज्याचा मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.

संत्री आरोग्याचा खजिना!
संत्र्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि त्वचा सुधारते. याव्यतिरिक्त, संत्र्यांमध्ये असलेले फ्लेव्होनॉइड्स हृदयाचे आरोग्य सुधारतात, कोलेस्टेरॉल नियंत्रित करतात आणि रक्तवाहिन्या ब्लॉक होण्यापासून रोखतात. संत्र्यांमध्ये आढळणारे फायबर पचनसंस्था सुधारते आणि पोटाची चरबी कमी करण्यास मदत करते.

तज्ज्ञ म्हणतात…
या अभ्यासाचे नेतृत्व करणारे डॉ. राज मेहता यांनी हार्वर्ड गॅझेटला सांगितले की, भविष्यात नैराश्यावर उपचार करण्यासाठी संत्र्यांचा समावेश औषधांमध्ये केला जाऊ शकतो. नैराश्य ही एक गंभीर समस्या आहे आणि तिच्या उपचारांसाठी नवीन आणि सुरक्षित पर्यायांची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत, संत्रा हा एक सोपा आणि दुष्परिणाममुक्त उपाय असू शकतो.

हेही वाचा :

दुबईवरून नवरा परतला, बायकोने प्रियकराच्या मदतीनं दोन तुकडे केले अन्…

संजयकाका पाटील पुन्हा भाजपमध्ये परतणार? विशाल पाटलांना दिलेल्या ऑफरवरही चंद्रकांत पाटील स्पष्टच बोलले!

शिक्षकानेच ओलांडली मर्यादा! विद्येच्या मंदिरात विद्यार्थ्यांना पाजली दारु; संतापजनक VIDEO व्हायरल