छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी अभिनेत्री हिना खान ही सध्या स्तनाच्या कर्करोगाशी(cancer) झुंज देत आहे. हिनावर सध्या किमोथेरेपीचे उपचार सुरू आहेत. हिना आपल्या चाहत्यांसह उपचाराचे सगळे अपडेट्स शेअर करत असते. या दरम्यान, हिनाने आता आपल्या प्रकृतीबाबत अपडेट दिली आहे. किमोथेरेपीचे साईड इफेक्ट्स होत आहेत. त्यामुळे तिला नवा आजार जडला आहे.
हिना खानला तिसऱ्या पातळीवरील स्तनांचा कर्करोग(cancer) झाला आहे. हिना खानने आपल्या इन्स्टा पोस्टवर केमोथेरिपीच्या साईड इफेक्टमुळे झालेल्या आजाराबाबत सांगितले आहे. केमोथेरपीच्या दुष्परिणामांमुळे तिला म्युकोसायटिसचा त्रास होत असल्याचे तिने सांगितले.
हिनाने तिच्या पोस्टमध्ये म्हटले की, “केमोथेरपीचा आणखी एक दुष्परिणाम म्हणजे म्यूकोसिटिस. मात्र, त्याच्या उपचारासाठी मी डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करत आहे. तुमच्यापैकी कोणाला यातून गेले असेल किंवा काही उपयुक्त उपाय माहित असेल तर कृपया सुचवा. ज्यावेळी आपण काही खाऊ शकत नाही, ही बाब खूपच कठीण आहे. त्यामुळे तुम्ही दिलेल्या माहितीचा फायदा होईल असेही हिनाने म्हटले.
हिना खानने आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. हिनाच्या पोस्टवर चाहत्यांनी तिला धीर देणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्याने म्हटले की, “तू लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.” दुसऱ्याने लिहिले, “लवकर बरे व्हा.” तुझ्यासाठी प्रार्थना करतो.” एकाने कमेंटमध्ये लिहिले, ” योग्य उपचार करा, एका वाईट सल्ल्याने परिस्थिती आणखी बिघडू शकते.”
हिना खानने इन्स्टाग्रामवर एक हेल्थ अपडेट शेअर केली होती. तिने पाच केमोथेरेपी पूर्ण केल्या असून आणखी तीन इनफ्यूजन शिल्लक असल्याचे हिनाने सांगितले. काही दिवस कठीण असतात आणि काही खूपच खूपच कठीण असतात, जसा की आजचा दिवस आहे आणि मला आज खूप बरं वाटत असल्याचे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले.
हिना खानने आपल्या स्तनांचा कर्करोग झाल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. हिना खानने ही पोस्ट केल्यानंतर एकच खळबळ उडाली. अनेक कलाकारांनी तिला धीर देत सकारात्मक विचार आणि उपचाराने बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या..
हेही वाचा:
लाडक्या बाप्पाच्या आगमनापूर्वीच आनंदवार्ता, सोन्याचे दर घरसले
राइड कॅन्सल करताच रिक्षावाल्याला राग अनावर, तरुणीला कानशिलात लगावले, Video Viral
आज हरतालिका व्रत, ‘या’ 5 राशींवर राहील शिव-पार्वतीची कृपा