दिल्लीमध्ये अंमलबजावणी (implementation) संचलनालयाच्या (ईडी) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मंगळवारी रात्री टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवलं. या अधिकाऱ्याचं नाव आलोक कुमार रंजन असून, त्यांचा मृतदेह साहिबाबाद येथील रेल्वे ट्रॅकवर आढळला. घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
आलोक कुमार रंजन यांचं नाव एका कथित भ्रष्टाचार प्रकरणात पुढे आलं होतं. या प्रकरणात सीबीआय आणि ईडी या दोन्ही यंत्रणांनी चौकशी सुरू केली होती. विशेष म्हणजे, आलोक कुमार यांचं नाव सीबीआयच्या एफआयरमध्येही नोंदवण्यात आलं होतं, ज्यामुळे ते तणावात होते. या तणावातूनच त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे (implementation).
ईडीचे सहायक संचालक संदीप सिंह यांना ५० लाख रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणात सीबीआयने अलीकडेच अटक केली होती. त्यानंतर आलोक कुमार रंजन यांच्या विरोधातही कारवाई सुरू होण्याची शक्यता होती, ज्यामुळे त्यांना मानसिक धक्का बसला होता.
दिल्ली पोलिसांकडून या प्रकरणी अधिक चौकशी सुरू असून, आलोक कुमार यांच्या आत्महत्येच्या मागील कारणांचा शोध घेतला जात आहे. ईडीच्या काही अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली, परंतु त्यांनी या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला.
हेही वाचा:
सकाळची हेल्दी सुरूवात करण्यासाठी बेस्ट आहे अॅपल-मखाणा स्मुदी, जाणून घ्या रेसिपी
भारत बंदची घोषणा 21 ऑगस्टला: काय बंद आणि काय उघडे राहणार