बदलापूर शाळेतील सीसीटीव्ही फुटेज गायब प्रकरणी तपास सुरू, शिक्षणमंत्री केसरकर यांचे आश्वासन

बदलापूर येथील शाळेत घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, शाळेतील(school) मागील १५ दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज गायब झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, शिक्षण विभागाच्या चौकशी समितीने या घटनेची दखल घेतली असून, फुटेज गायब होण्यामागे नेमके काय कारण आहे याचा शोध घेतला जात आहे.

केसरकर यांनी आश्वासन दिले की या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. शाळेच्या पदाधिकाऱ्यांना या घटनेची माहिती असूनही त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शाळांमध्ये मुलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हेही वाचा:

अपहरण झालेला वयोवृद्ध कारमध्ये मृत आढळला, हत्येचा गुन्हा दाखल

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला; आमदाराने कार्यालय फोडले

एक घरावरून दुसऱ्या घरावर; तरुणाने केला धोकादायक स्टंट, Video Viral