आपल्या लांबसडक आणि घनदाट केसांच्या(hair) स्वप्नासाठी महिलांनी अनेक उपायांची निवड केली आहे. केसांना घामाची दुर्गंधी येऊ नये म्हणून हेअर परफ्यूम आणि सिरमचा वापर करणं आता एक सामान्य प्रथा बनली आहे. कोणत्याही कार्यक्रमाला जाताना या उत्पादनांचा वापर अधिक केला जातो, ज्यामुळे आजकाल अनेक महिलांच्या मेकअप किटमध्ये हेअर परफ्यूम आणि सिरम नेहमीच असतात.
बाजारातही आता विविध ब्रँड्सचे हेअर परफ्यूम उपलब्ध आहेत, जे केसांना दिवसभर सुगंधित ठेवण्याचे वचन देतात. परंतु, त्वचेसाठी त्रासदायक असलेल्या परफ्यूमप्रमाणेच हेअर परफ्यूमचा वापर केल्याने केसांवर काही नकारात्मक परिणाम होतात का, असा प्रश्न सध्या महिलांमध्ये चर्चिला जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, हेअर परफ्यूममध्ये असलेले अल्कोहोल आणि कृत्रिम सुगंधी घटक केसांच्या नैसर्गिक आर्द्रतेला हानी पोहोचवू शकतात. यामुळे केस कोरडे, तुटक आणि निस्तेज होऊ शकतात. हेअर सिरमचे नियमित वापराने केसांना चमक येऊ शकते, पण यातील काही रसायनं दीर्घकालीन वापरात केसांमध्ये रासायनिक नुकसान करू शकतात. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला असा आहे की, हेअर परफ्यूम आणि सिरमचा वापर कमी प्रमाणात आणि योग्य पद्धतीने करावा.
आपल्या केसांचे आरोग्य कायम राखण्यासाठी नैसर्गिक उपाय आणि केसांच्या स्वच्छतेवर अधिक भर द्यावा, असे तज्ज्ञ सुचवतात. केसांना योग्य पोषण देणारे तेल, शॅम्पू आणि कंडिशनर यांचा वापर करणे हे केसांच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते.
हेही वाचा:
सिंधुदुर्गमधील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावर राज ठाकरे आक्रमक;
नितीन पाटील यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड; अधिकृत घोषणा, प्रमाणपत्र प्रदान
मालवणमधील शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्यामागे ‘वातावरणीय परिस्थिती’ कारणीभूत – मुख्यमंत्री शिंदे