“आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस कशाप्रकारे(politics)डाव खेळत होते, हे मला अनिल देशमुख यांनी सांगितले. आता एक तर तू राहशील नाहीतर मी राहील”, असं म्हणत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील मेळाव्यातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिले. त्यानंतर भाजपकडून देवेंद्र फडणवीसांचा व्हिडिओ पोस्ट करत प्रत्युत्तर देण्यात आलंय.
![](https://smartichi.com/wp-content/uploads/2024/07/image-45-1024x819.png)
या व्हिडिओला भाजपने “उद्धव ठाकरे फक्त एवढं लक्षात ठेवा…”, असं कॅप्शन(politics) दिलं आहे. या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणतात, माझा एक सिद्धांत पक्का आहे. मी कोणाच्या नादी लागत नाही. कोणी नादी लागलं तर सोडत नाही.
अनेक जण म्हणाले, उद्धवजी तुम्ही देशाला दिशा दाखवली. मी म्हणालो आपण जोपर्यंत सरळ होतो. तेव्हा सरळ एकदा वाकड्यात घुसलो तेव्हा आपण वाकड करतो. भाजप म्हणजे चोर कंपनी आहे. राजकारणतली षंड माणसं आहेत. आपण असा लढलो की मोदींना सुद्धा घाम फुटला.
मोदीचं भाषण ऐकताना कीव येतीये. मी नगरसेवक कधी झालो नाही थेट मुख्यमंत्री झालो, जे शक्य होतं ते मी सगळं केलं. हे आपल्यासाठी शेवटचं आव्हान आहे. त्यानंतर आपल्याला आव्हान देणार कोणी राहणार नाही. यांनी पक्ष कुटुंब सगळं फोडलं. आता हे आपल्याला आव्हान द्यायला उभे आहेत, असंही ठाकरे म्हणाले.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेना गंजलेली तलवार नाहीये, तळपती तलवार आहे. मुंबई टिकविण्यासाठी आपल्याला लढा द्यायचा होता. आपल्या हक्काच्या मुंबईत आपल्यला असा वागावलं जातय. ते दोन व्यापारी असं करत आहेत, त्यांची वृत्ती आपल्याला मुळासकट काढायची आहे.
माझ्या आजोबाला शेलार मामा म्हणायचे हा शेलार नाही. आम्ही आमचं स्वतः चा लुटायला देणार नाही. लुटायला आला तर तोडून टाकू. मराठी माणसामध्ये सुद्धा फूट पाडण्याचा काम हे व्यापारी करत आहेत. ना खाऊ ना खाणे दूंगा अरे किती खाताय? खालेलं जाताय कुठाय? असा सवलाही उद्धव ठाकरेंनी केला.
हेही वाचा :
त्र्यंबकेश्वर मंदिरातील विशेष दर्शन व्यवस्था श्रावणात बंद
दररोज ३ किमी चालण्याचा शरीरावर होतो ‘असा’ परिणाम; जाणून घ्या
कोल्हापूरवर पुन्हा पुराचे सावट: चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज