एकनाथ खडसे चालले स्वगृही

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : एकाच घरावर एकापेक्षा अधिक राजकीय पक्षांचे झेंडे(at home) फडकत आहेत असे चित्र महाराष्ट्रात काही ठिकाणी पाहायला मिळते. आता त्यामध्ये जळगावच्या मुक्ताईनगरच्या खडसे यांच्या घराची भर पडली आहे. एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला गुड बाय करत स्वगृही म्हणजे भाजपात जात आहेत. आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे या राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याने त्यांच्या घरावर दोन झेंडे दिसणार आहेत. आता एकनाथ खडसे यांच्यावरील कारवाया गुंडाळून ठेवल्या जातील. त्यांचे व्यवहार वैध ठरवले जातील. दंड माफ केला जाईल. आणि तसे झाले तर आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही.

2014 मध्ये महाराष्ट्रात (at home)भाजपचे सरकार आले. तेव्हा एकनाथ खडसे हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार होते. तथापि नागपूरच्या रेशीम बाग म्हणजे संघ मुख्यालयाच्या आदेशावरून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यात आले. दिल्लीत नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र असे झाल्यावर खडसे यांना क्रमांक दोनचे महसूल खाते देण्यात आले. पुणे औद्योगिक वसाहती मधील भूखंड खरेदी प्रकरण त्यांच्या अंगलट आल्यानंतर त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

त्यानंतर त्यांचा खडतर राजकीय प्रवासात सुरू झाला. त्यांचे महसूल खाते चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले तेव्हा महसूल खात्याच्या या “पादुका “म्हणून मी स्वीकारल्या आहेत. त्यांच्याकडे त्या पुन्हा सुपूर्त केल्या जातील असे चंद्रकांत दादा तेव्हा म्हणाले होते. पण एकनाथ खडसे यांची”बुडत्याचा पाय खोलात”अशी अवस्था झाली. त्यांच्यावर आणि कुटुंबीयांवर भ्रष्टाचाराचा ठपका ठेवण्यात आला. पक्षात त्यांना एकाकी पाडण्यात आले आणि मग त्यांनी भाजपला राम राम ठोकला. त्यांची पाऊले राष्ट्रवादीच्या दिशेने वळू लागली.

शरद पवार यांनी एकनाथ खडसे यांना सन्मानाने राष्ट्रवादीत घेतले. दिनांक 10 जून 2022 मध्ये विधानपरिषदेवर घेऊन त्यांचे राजकीय पुनर्वसनही केले. भाजप विरोधी, देवेंद्र फडणवीस विरोधी एक चेहरा म्हणून शरद पवारांनी खडसे यांना घेतले खरे पण राष्ट्रवादीमध्ये त्यांचा जीव गुदमरू लागला होता. अजितदादांच्या बरोबर जाऊन, भाजपाच्या अगदी जवळ त्यांना जाता आले असते पण काही प्रश्न आणि समस्यांचे निराकरण व्हायचे होते. ते स्वग्रही जाणार अशा बातम्या त्यांच्याकडूनच मीडियामध्ये पेरल्या जात होत्या. काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे या दोघांनी नवी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेऊन स्वगृही परतण्याचा मार्ग सुकर करून घेतला होता.

नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान करण्यासाठी भारतीय जनता पक्षांनी साधन शोचिता बाजूला ठेवली. भ्रष्टाचाराचा संशय असलेल्या, ईडी किंवा तत्सम यंत्रणांनी रडारवर घेतलेल्या अनेकांना पावन करून घेतले. बाहेर त्यांना स्वच्छ केले जात असेल तर मग एकनाथ खडसे हा आपलाच माणूस आहे. त्याला सुद्धा स्वच्छ करून पक्षात घ्यायला काय हरकत आहे? त्यांच्या येण्याचा जळगाव रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपला फायदाच होईल असा विचार करून त्यांना भाजपात घेतले जात आहे.

सध्या भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळात विनोद तावडे यांच्या शब्दाला वजन आहे. त्यांनीच एकनाथ खडसे यांच्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले. गाऊन खनिज प्रकरणात एकनाथ खडसे यांच्यावर 197 कोटी रुपयांचा दंड ठोठावला गेला आहे. हा दंड माफ करण्यात आला आहे. आता त्यांचे पुणे औद्योगिक वसाहती मधील भूखंड खरेदी प्रकरणही थंड केले जाईल. अजितदादा पवार, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल वगैरेंना जो न्याय देण्यात आलेला आहे तोच न्याय मला सुद्धा मिळाला पाहिजे अशी अट वरिष्ठ पातळीवर मान्य करण्यात आल्यानंतर एकनाथ खडसे हे निश्चिंत मनाने भाजपमध्ये अर्थात स्वगृही परतत आहेत.

मात्र त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी शरद पवार गट आपण सोडणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. शरद पवार यांना एकाच वेळी दोन धक्के नकोत असा विचार करून रोहिणी खडसे यांनी पक्ष न सोडण्याचा निर्णय घेतलेला असावा.
एकनाथ खडसे हे 2014 पूर्वी राज्याचे विरोधी पक्ष नेते होते. त्यांनी काँग्रेस आघाडीच्या सरकारला विरोधी पक्ष नेता म्हणून चांगले धारेवर धरले होते. त्यांचे एकूण उपद्रव मूल्य लक्षात घेऊन तसेच ओबीसीचा चेहरा म्हणून त्यांना भाजपामध्ये सन्मानाने घेतले जात आहे. अर्थात आता त्यांच्यावरील पूर्वीची प्रकरणे विस्मृतीत जातील.

हेही वाचा :

गर्भपातानंतर कन्सिव्ह करणं कठीण, 41 व्या वर्षी लोकप्रिय अभिनेत्री झाली आई! 

सांगलीचा वाद मिटेना! नाना पटोलेंचा संजय राऊतांना थेट इशारा; नेमकं काय म्हणाले?

एप्रिलमध्ये उन-पावसाचा खेळ, ‘या’ तारखेपर्यंत राज्यात गारपिटीसह पावसाचा इशारा