पूर्वाश्रमीचे भाजप नेते एकनाथ खडसे हे पु्न्हा एकदा भाजपमध्ये(express entry) प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे शनिवारी रात्रीच ते प्रवेश करतील, असं मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीमध्ये म्हटलंय.
एकनाथ खडसे हे २०१४ मध्ये मुख्यमंत्री पदासाठी(express entry) इच्छूक होते. परंतु पक्षाने त्यांच्याऐवजी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद दिलं. त्यामुळे नाराज झालेले खडसे विरुद्ध फडणवीस, असा संघर्ष सुरु झाला. पुढे त्यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोपही झाले. पक्षांतर्गत हेटाळणीमुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खडसेंना अपेक्षेप्रमाणे फारकाही मिळालं नाही. पक्षात कायम मागे राहिलेल्या खडसेंच्या हाती काहीच लागलं नव्हतं. त्यातच आता ते पुन्हा स्वगृही परतणार असल्याचं बोललं जातंय. शनिवारी रात्रीच त्यांचा प्रवेश होईल, असं वृत्त ‘एबीपी माझा’ने दिलं आहे.
हेही वाचा :
वंचित अन् ठाकरे गटामुळे शेट्टी, मानेंसमोर अडचणींचा डोंगर
चेन्नईच्या पराभवानंतर ऋतुराज गायकवाड या खेळाडूंवर भडकला
आखिर क्या मजबूरी है.. अभिनेत्रीचा डान्स पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली Video