महाराष्ट्रात महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळालं आहे. तर महाविकास आघाडीचा(latest political news) दारुण पराभव झाला आहे. परंतु, निकालानंतर महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार हा एकच प्रश्न सर्वांना पडला आहे. मात्र एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी जोरदार प्रयत्न करुन भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच आता एकनाथ शिंदेंनी एक गुगली टाकली आहे.
सत्तास्थापनेला वेग आल्यानंतर एकनाथ शिंदे(latest political news) यांनी आपल्यालाच पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी जोरदार धरला असून भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र यावेळी 137 आमदारांचे पाठबळ असलेल्या भाजपने हा दबाव झुगारुन देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असा स्पष्ट संदेश एकनाथ शिंदे यांना दिला आहे. मात्र या सर्व घडामोडीनंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमधून माघार घेतल्यानंतर त्यांनी एक गुगली टाकल्यामुळे महायुतीपुढे पुन्हा नवा पेच निर्माण झाला आहे.
भाजप पक्षाने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद सोडण्याच्या मोबदल्यात केंद्रात महत्वाचं खात किंवा राज्यात उपमुख्यमंत्रीपद देण्याची ऑफर देखील दिली होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या या दोन्ही ऑफर्स नाकारल्या आहेत. त्याऐवजी एकनाथ शिंदे यांनी राज्यात एक नवा प्रस्ताव भाजपसमोर ठेवला आहे.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी, राज्यात मला पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळणार नसेल तर मला महायुती सरकारचा संयोजक हे पद मला द्यावे. कारण राज्यातील विधानसभा निवडणूक ही माझ्या नेतृत्त्वाखाली लढवण्यात आली असल्याचं एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे. याशिवाय खासदार श्रीकांत शिंदे यांना राज्यात उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावे अशी मागणी देखील एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या या मागणीने भाजप आणि महायुतीचे दिग्गज नेते पुन्हा एकदा बुचकाळ्यात पडले आहेत. त्यामुळे आता भाजपने अद्याप या प्रस्तावावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच याबाबत भाजपच्या वर्तुळात अद्यापही खलबत सुरु असून त्यामुळेच महायुती सरकारच्या शपथविधीला उशीर होत असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
हेही वाचा :
केंद्र सरकारची महाराष्ट्रासाठी Good News! शेतकऱ्यांना होणार फायदा
तापमान 8 अंशांवर; पुढील तीन महिने कडाक्याच्या थंडीचे
मराठा आरक्षणासंदर्भात जरांगे पाटलांची सर्वात मोठी घोषणा!