एकिकडे लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना दुसरीकडे पक्षांतरं(political news), पक्षप्रवेश आणि नाराजीनाट्य सुरुच आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना निवडून आणण्यासाठी महायुतीने शक्ती पणाला लावली असताना मुख्यमंत्री शिंदे यांना जबरदस्त धक्का बसलाआहे.
शिंदे यांच्या शिवसेनेचे कल्याण-मुरबाड जिल्हाप्रमुख अरविंद मोरे(political news) यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. उद्धव ठाकरे यांचे शिलेदार मानले गेलेले मोरे यांनी ठाकरे गटाची साथ सोडत शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल धाले होते. नुकतेच कल्याण येथे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत व्यासपीठावर आपल्याला स्थान मिळाले नाही, व्यासपीठावर आपल्याला बसवण्यात आले नाही, यामुळे त्यांनी शिंदेंना रामराम केला आहे.
अरविंद मोरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे आपला राजीनामा पत्र पाठवले आहे. या पत्रात ते म्हणतात, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महायुतीचे उमेदवार कपिल पाटील आणि श्रीकांत शिंदे यांच्यासाठी कल्याणमध्ये प्रचारसभा पार पडली. या सभेत आपल्याला उचित मान दिले गेले नाही. माझी जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती झालेली आहे. माझ्याच हाताखाली आमदार विश्वनाथ भोईर व त्यांच्यासह सर्वच पदाधिकारी काम करत असतात. मात्र त्यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले. मात्र आम्ही पक्षासाठी अहोरात्र काम करत असतो. मात्र आम्हाल व्यासपीठावर जागा दिली गेली नाही. मग माझ्या पदाचा काय उपयोग?”
उद्धव ठाकरे यांचे एक प्रमुख शिलेदार मानले गेलेले अरविंद मोरे यांनी शिवसेनेतल्या फुटीनंतर ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्याकडे दाखल झाले. कल्याणच्या भागात ते चागलेत सक्रिय आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्राकांत शिंदे यांच्या प्रत्येक कार्यक्रम यशस्वी करण्यात ते नेहमीच प्रयत्नशील राहिले.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. मात्र आता कल्याणमधील मतदान अवघ्या दोन तीन दिवसांवर येऊन ठेपले असताना त्यांनी पक्षालाच सोडचिठ्ठी दिली आहे. यामुळे शिंदे गटाला आपल्या बालेकिल्ल्यातच जोरदार धक्का बसला आहे.
हेही वाचा :
आरटीई प्रवेशासाठी मार्गदर्शक सूचना जारी
भाजपा 255 च्या वर जाणार नाही; अर्थशास्त्रज्ञ परकला प्रभाकर यांचा दावा
इचलकरंजी येथील सांगली रोडचे नागरिक आक्रमक.… अन्यथा मोठे जन आंदोलन छेडणार