महाराष्ट्रातील एक एक जागा मिळवण्यासाठी महायुती-महाविकास आघाडीमध्ये काँटे की टक्कर(candidate) होत आहे. अजित पवारांनी महायुतीमध्ये जात उपमुख्यमंत्री पद मिळवले. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्तेत वाटेकरी निर्माण झाल्याची चर्चा शिंदेंच्या कार्यकर्त्यांमध्ये होती. लोकसभेमध्ये शिंदे-फडणवीस-पवार हे महायुतीत एकत्र लढले असले तरी अजित पवार यांचे उमेदवार पाडण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या यंत्रणेने खास प्रयत्न केल्याचा खळबजनक दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आपल्या ‘सामाना’तील लेखात केलाय.
‘एकनाथ शिंदे यांनी पैशांचा अफाट वापर या निवडणुकीत केला. प्रत्येक मतदारसंघात त्यांनी किमान 25-30 कोटी रुपये वाटले. पुन्हा अनेक उमेदवार(candidate) पाडण्यासाठी वेगळे बजेट. अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे व त्यांच्या यंत्रणेने खास प्रयत्न केले.’ असा थेट दावा राऊत यांनी केला.
राऊत यांनी एकनाथ शिंदेंना बेडकाची उपमा दिली आहे. ‘महाराष्ट्राने मोदी-शहांच्या झुंडशाहीशी झुंज दिली. त्यामुळे उद्याच्या दिल्लीतील परिवर्तनात महाराष्ट्राचे नेतृत्व महत्त्वाची भूमिका बजावेल. दिल्लीने महाराष्ट्रातील काही बेडूक फुगवले व त्यांना नेते बनवले. ते सर्व नेते राजकीय पटलावरून नष्ट होतील.’ असे म्हणत नाव न घेता एकनाथ शिंदे, अजित पवारांना टोला लगावला.
नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रितपणे नितीन गडकर यांचा पाडण्याचे प्रयत्न केले. गडकरी यांचा पराभव होत नसल्याची खात्री पटल्याने देवेंद्र फडणवीस हे नाइलाजाने प्रचार उतरले, असे संघाचे लोकच सांगत असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी आपल्या लेखात केला आहे.
हेही वाचा :
‘या’ 5 राशींसाठी जून महिना असणार भाग्यशाली; मिळणार चिक्कार पैसा
महाराष्ट्रात अँटी मोदी करंट, ‘या’ जागांवर बसणार महायुतीला ब्रेक
शरद पवार गटाला मोठा धक्का; पक्षातील तरूण चेहरा साथ सोडणार?