एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा देणार; कोण होणार पुढील CM?

विधानसभा निवडणुकांचा(politics) निकाल लागल्यानंतर राज्यात सत्ता स्थापनेला वेग आला आहे. महायुतीकडून अद्यापही मुख्यमंत्रीपद कुणाला मिळणार, याबाबत घोषणा झालेली नाही. विधानसभेचा आज कार्यकाळ संपतो आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज (26 नोव्हेंबर) आपल्या मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा देणार आहेत. सकाळी 11 वाजता ते आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवतील.

एकनाथ शिंदे (politics)यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला तरी, नवे सरकार स्थापन होईपर्यंत राज्यपाल त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्याची सूचना करतील. त्यानंतर महायुतीमध्ये सत्ता स्थापनेसाठी वेग येईल. युतीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपला तब्बल 132 जागांवर यश मिळाले आहे. त्यामुळे भाजपा मुख्यमंत्रीपदावर दावा करू शकते.

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडूनही देवेंद्र फडणवीस (भाजप)मुख्यमंत्री व्हावे, असं जाहीरपणे बोलून दाखवलं जात आहे. दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांच्यासाठी देखीक शिंदे गट आग्रही आहे. लाडकी बहीण योजनेचा प्रचार करताना एकनाथ शिंदे हेच प्रमुख चेहरा होते. या योजनेचा महायुतीला मोठा फायदा झाला आहे. त्यामुळे किमान अडीच वर्षे तरी शिंदे यांना मुख्यमंत्रिपद मिळावे, अशी भूमिका शिवेसना पक्षातील नेत्यांची आहे.

एकनाथ शिंदे यांनी अशात केलेलं एक ट्वीट देखील चर्चेत आलंय. महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे.

मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, असे आवाहन मी करतो. पुन्हा एकदा माझी नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये. समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढेही भक्कमच राहील, असं ट्वीट शिंदे यांनी केलं आहे.

दरम्यान, आज महाराष्ट्रात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यावरही नव्या सरकार स्थापनेसाठी आणि मुख्यमंत्रि‍पदाची निवड करण्यासाठी मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. महायुतीकडून अजूनही मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा ठरत नसल्याने शपथविधीचा कार्यक्रम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. आता पुढे काय घडामोड घडते आणि कोण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

हेही वाचा :

‘हे’ 20 मंत्री घेणार शपथ?, सर्वात मोठी अपडेट समोर

सांगलीत मंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात? ‘या’ बड्या नेत्यांची नावं चर्चेत

AIMIM नेत्याचा मोठा दावा, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होणार? ओवेसीचा असणार पाठिंबा