इचलकरंजी: अखेर इचलकरंजी विधानसभा निवडणूक 2024 साठी महाविकास आघाडीने आपला अधिकृत उमेदवार(candidate) जाहीर केला असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून मदनराव कारंडे यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यांचा प्रचार तुतारी या निवडणूक चिन्हावर होणार आहे. या उमेदवारीची अधिकृत घोषणा होताच इचलकरंजी शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
मदनराव कारंडे हे स्थानिक राजकारणात एक प्रस्थापित नाव असून, त्यांनी आपल्या समाजसेवेच्या माध्यमातून जनतेच्या मनात एक वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनेक वर्षांपासून त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची मागणी केली होती. अखेर महाविकास आघाडीने त्यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारीची(candidate) घोषणा केली आहे.
मदनराव कारंडे यांच्या उमेदवारीमुळे इचलकरंजीच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडणार असल्याचे बोलले जात आहे. भाजप आणि इतर विरोधी पक्षांमध्ये आता एक नवीन तणाव निर्माण झाला आहे. आगामी निवडणुकीत मतदारांचा कल कोणत्या बाजूला राहील, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
हेही वाचा :
ऐन विधानसभा निवडणुकीत पिकअपमधून मोठं गबाड हाती
अदानींच्या अंबुजा सिमेंटकडून विकत घेतली जाणार, देशातील ‘ही’ प्रमख सिमेंट कंपनी !
8 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होणार? आयटीआरचा आकडा 9 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता!