अमेरिकेत आज नव्या राष्ट्राध्यक्षपदाच्या (president)निवडीसाठी मतदान होत आहे. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार तसेच माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार तसेच सध्याच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्यात ही लढत होत आहे. यांच्यातील ही लढत अत्यंत चुरशीची ठरेल असे सर्वेक्षणातून सांगितले जात आहे.
आयोवामध्ये रविवारी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात डोनाल्ड्र ट्रम्प यांच्यापेक्षा कमला हॅरिस या आघाडीवर होत्या. मात्र हे सर्वेक्षण निराधार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते. राष्ट्राध्यक्षपदाच्या(president) निवडणुकीत रविवारपर्यंत साडेसात कोटी मतदारांनी मतदान केले.
एनसीबीने केलेल्या सर्वेक्षणानुसार ही लढत चुरशीची होणार असल्याचे म्हटले आहेत. तसेच यावेळेस ट्रम्प आणि हॅरिस दोघांनाही ४९ टक्के मतदारांनी पाठिंबा दिला.
हेही वाचा :
“मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवर भोजपुरी गाण्यावर बाई नाचते, हीच का लाडकी बहीण योजना?”
प्रसिद्ध अभिनेत्रीची पर्स आणि सोनसाखळी चोरीला
हार्दिक, बुमराहसह 6 जण कायम? रिटेन्शन यादीत एक अनपेक्षित नाव