महाराष्ट्रामध्ये ‘या’ तारखेला होणार निवडणूक? कधी लागणार आचारसंहिता?

मुंबई : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण(political) रंगले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच राज्यामध्ये विधानसभा निवडणूकीची तयारी सुरु झाली. लोकसभेचा निकाल अपेक्षित न लागल्यामुळे महायुतीला मोठा फटका बसला. त्यामुळे विधानसभेसाठी महायुतीने जोरदार तयारी सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी महाराष्ट्रामध्ये निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेऊन गेले आहे. यानंतर आता राज्यामध्ये निवडणूकीची तारीख समोर आली आहे.

राज्यामध्ये सर्वच पक्ष विधानसभा(political) निवडणूकीसाठी उत्सुक आहेत. त्यामुळे प्रचाराचा धुराळा देखील उडाला आहे. आता राज्यामध्ये दसऱ्यानंतर लगेचच विधानसभा निवडणूका होण्याची शक्यता आहे. निवडणुकीची घोषणा ही येत्या 13 ऑक्टोबरनंतर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांची जोरदार तयारी सुरु झाली आहे. राज्यामध्ये ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे नेत्यांचे सभा, बैठका आणि चर्चा यांचे सत्र वाढले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या 8 ऑक्टोबरला हरियाणा व जम्मू काश्मीर निवडणुकांचे निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. 10 ऑक्टोबरला हरियाणा- जम्मू काश्मीर निवडणूक कार्यक्रम संपणार आहे. नियमानुसार एक निवडणूक कार्यक्रम संपण्यापूर्वी दुसऱ्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करता येत नाही. दरम्यानच्या काळात निवडणूक आयोगाला तयारी करावी लागेल. 13 ऑक्टोबरला रविवार आहे. 14 तारखेनंतर सुरु होणाऱ्या ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आचारसंहितेची घोषणा होऊ शक्यता आहे. त्यामुळे आता सर्व पक्षांची तयारी सुरु झाली आहे.

महाविकास आघाडीची जागावाटपांची बोलणी अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. मुंबईच्या काही जागांवर महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच आहे. मात्र चर्चा सुरु असून हा तिढा सुटण्याच्या मार्गावर आहे. महायुती देखील राज्यामध्ये पहिल्यांदाच एकत्रित विधानसभा निवडणूका लढत आहे. महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन वेळा महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. त्यामुळे आता राज्यामध्ये राजकारण जोरदार रंगले असून दिल्ली दौरे वाढले आहे. प्रचारासाठी यात्रा काढल्या जात आहे.

हेही वाचा:

सर्वसाक्षी तो परमेश्वर आणि इथले राजकारण!

इचलकरंजीमध्ये यश ग्रुप आपटे कॉर्नर तर्फे धनंजय पवारच्या विजयासाठी अभिषेक

नदीत पोहायला गेलेल्या शाळकरी मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू”

लाडक्या बहिणींची दिवाळी: भाऊबीजेची ओवाळणी ऑक्टोबरलाच, सरकार नोव्हेंबरचे पैसे आधीच देणार