जव्हार : रोजगाराची वाणवा असलेल्या जव्हार तालुक्यात महायुती सरकारने महिलांसाठी सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना फायद्याची ठरत आहे. जव्हार तालुक्यातील 34 हजार 474 लाडक्या बहिणींचा आर्थिक आधार बळावला. विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागल्याने बहिणी शांत बसल्या होत्या. मात्र, आता त्यांना सहाव्या हप्त्याची (installment payment) प्रतीक्षा लागल्याने बँकेत खाते तपासणीसाठी दाखल होऊ लागल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ गेमचेंजर ठरल्याने महायुती सरकार विक्रमी मताधिक्याने पुन्हा एकदा सत्तेवर आले. महायुतीला चांगले यश मिळाले असून, बहुमताचा आकडाही पार केला आहे. पण, महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला आहे. बहुमताचा आकडा पार केल्याने महायुतीकडून आता सरकार स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. असे असताना महिलांचे लक्ष सरकार स्थापनेऐवजी लाडक्या बहिणीचे पैसे कधी मिळणार याकडे लागले आहे.
लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केल्याने, महायुतीला भरघोस विजय साजरा करणे शक्य झाले. आता लाडक्या बहिणींना पुढील हप्त्याची(installment payment) प्रतीक्षा असून, तो खात्यात कधी जमा होणार, याची चर्चा रंगत आहे. आतापर्यंत या योजनेचे पाच हप्ते बहिणींच्या खात्यात जमा झाले आहेत. जुलै 2024 पासून सुरू करण्यात आलेल्या या योजनेंतर्गत मुदतीपर्यंत तालुक्यात 34 हजार 474 महिला पात्र ठरल्या आहेत. पात्र ठरलेल्या बहुतांश महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा पहिला आणि दुसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील हफ्ताही काही दिवसांच्या फरकाने महिलांच्या खात्यात जमा झाला. तसेच नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागू होणार असल्याने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे एकत्रित पैसे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या खात्यात जमा केले.
आल्यास लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपयांहून २१०० रुपये करणार असल्याचे आश्वासन महायुतीकडून देण्यात आले होते. आता महायुतीचे सरकार आल्याने, लाडकी बहीण योजनेचा हप्ता २१०० रुपये होणार का, अशीही चर्चा बहिणींमध्ये रंगत आहे. हा धोरणात्मक निर्णय असल्याने कॅबिनेटच्या बैठकीतच याबाबतचा निर्णय होणे अपेक्षित असल्याने, डिसेंबरचा हप्ता दीड हजारांप्रमाणेच दिला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
हेही वाचा :
पुनरावृत्ती, प्रियकराने प्रेयसीवर अत्याचार करून मृतदेहाचे केले 40 तुकडे
ललित मोदीच्या विधानाने आयपीएल हादरले, पंचांकडून फिक्सिंग केल्याचा संघ मालकावर आरोप
अनन्या पांडेचा मोठा खुलासा: आदित्यसोबतच्या ब्रेकअपचं खरं कारण समोर आलं