मासिक पाळीत नोकरदार महिलांना मिळणार सुट्टी

महिलांसाठी एक खुशखबर आहे. आता सरकारी आणि(employees) खासगी क्षेत्रामधील महिला कर्मचाऱ्यांना महिन्यातून एका दिवसाची रजा मिळणार आहे. ओडिशाचे उपमुख्यमंत्री प्रवती परिदा यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त ही मोठी घोषणा केलीय. कटक येथे जिल्हास्तरीय स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात ओडिशाच्या उपमुख्यमंत्र्‍यांनी हा निर्णय जाहीर केलाय.ओडिशाचे उपमुख्यमंत्री प्रवती परिदा कटक येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त बोलताना म्हणाल्या की, आजपर्यंत महिलांना मासिक पाळीच्या काळात सुट्टी मिळत नाही. त्यामुळे सरकारने या काळात महिलांना एका दिवसाची सुट्टी देण्याचा निर्णय घेतलाय.

या अंतर्गत महिला त्यांच्या पीरियड्सच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी सुट्टी घेऊ शकतात. त्यांच्यासाठी ही रजा ऐच्छिक असणार आहे, म्हणजेच त्यांना हवी असेल तरच रजा मिळेल.हा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांसोबत खासगी कंपन्यांना देखील लागू होणार असल्याचं परिदा यांनी सांगितलंय.(employees) जपान, तैवान, चीन आणि कोरियासारख्या देशांनी पीरियड्सबाबत विशेष धोरणं बनवलेली आहेत. आणि आता भारतात देखील याची मागणी होत आहे. त्यामुळे ओडिशा सरकारने या दृष्टीने पाऊल उचललंय. ओडिशा सरकारने घेतलेल्या या निर्णयाचं सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील कौतुक केल्याची माहिती मिळतेय

उपमुख्यमंत्री प्रवती परिदा म्हणाल्या की, या उपक्रमामागील उद्देश महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देणे हा आहे. रजा घेण्याचा निर्णय ऐच्छिक आहे. ज्या महिला(employees)व्यावसायिक कामात गुंतल्या असतील त्या मासिक पाळीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी सुट्टी घेऊ शकतात. एका संशोधनानुसार ४० टक्के मुली पीरियड्समुळे शाळेत जाणं टाळतात. शाळेतील गोपनीयतेचा अभाव, शिक्षणाचा अभाव अन् जागरूकता यासारख्या बाबी यास कारणीभूत आहेत.

हेही वाचा :

लाडकी बहीण योजना निवडणुकीनंतर सुरु राहील का? महायुती सरकारमधील मंत्र्यांनी केलं मोठं वक्तव्य

इचलकरंजीतून राहुल आवाडेच उमेदवार! हातकणंगले आणि शिरोळमधूनही……

कीमोथेरेपी सुरु असताना परत आले केस! कॅन्सरग्रस्त हिना खानचा आनंद गगनात मावेना

“नवरा माझा नवसाचा 2” चित्रपटाचे धमाकेदार टीजर झाले लाँच!